Home
वृक्षप्रेमी गणेशआप्पांचा वाढदिवस ६१ झाडे लावून साजरा
वृक्षप्रेमी गणेशआप्पांचा वाढदिवस ६१ झाडे लावून साजरा
मानवत तालुका प्रतिनिधी – शहरातील वृक्षप्रेमी नागरिक व शिवराज सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेशआप्पा चिंचोलकर यांनी त्यांचा ६१ वा वाढदिवस मंगळवारी ता ११ विविध प्रकारची ६१ झाडे लावून साजरा केला.
गेल्या अनेक वर्षापासून गणेशअप्पा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात वृक्ष लागवडीचे कार्य मोफत करीत असून त्यांनी आतापर्यंत १० हजार रोपे तयार करून मोफत वाटप केलेले आहे . त्यांनी आज शहरातील रेणुका मंगल कार्यालय, मोंढा परिसर व वाघेश्वर मंदिर येथे उंबर, चिंच, करंजी, जांभूळ इत्यादी ६१ झाडे लावून वाढदिवस साजरा केला.
यावेळी वैभव महाजन, रवी बाराहाते, त कार्तिक चिंचाने, साई चोपडे, अशोक चोपडे, सतीश चोपडे, गोपाल बाकळे, गुलाबसिंग ठाकूर, बळीराम माने व मुंजाभाऊ तरटे आदीजण उपस्थित होते.