आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्र

लोह्याचे भूमिपुत्र पोलीस उपाधीक्षक गजानन भातलवंडे याना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

लोह्याचे भूमिपुत्र पोलीस उपाधीक्षक गजानन भातलवंडे याना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान
————

लोहा – लोह्याचे भूमिपुत्र लातूर येथे डीवायएसपी म्हणून कार्यरत असलेले गजानन लक्ष्मीकांत भातलवंडे याना २०२२ मध्ये प्रजासताक दिनी पोलीस दलातील विशेष उल्लेखनीय कार्यासाठी जाहीर झालेले राष्ट्रपती पोलीस पदक राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबई येथे बुधवारी (७जून) रोजी राजभवन मुंबई येथे प्रदान करण्यात आले.
लोह्याचे भूमिपुत्र गजानन भातलवंडे हे लातूर येथे डीवायएसपी म्हणून कार्यरत आहेत शालेय शिक्षण लोह्यात झाल्या नंतर परभणी येथील वनामकृवि येथून ते बीएस्सी अग्री झाले व स्पर्धा परीक्षा देऊन थेट १९९३ मध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदावर भंडारा येथे रुजू झाले भंडारा, गोंदिया या नक्षलग्रस्त भागासोबतच नांदेड, बीड, परभणी, लातूर या जिल्ह्यातत्याची सेवा उत्कृष्ट ठरली.नांदेड येथे पीआरओ तसेच जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्याने केलेले काम तेथील ग्रामस्थांच्या मनात आदराचा भाव निर्माण करणारे ठरले आहेत.
श्री. भातलवंडे पोलीस निरीक्षक असताना त्यांनी लातूर शहरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात इंचार्ज म्हणून काम केले स्थानिक गुन्हे शाखेत त्याची कामगिरी ” सर्वोत्कृष्ट”ठरली.
पोलीस खात्यातील ३३वर्षाच्या सेवा काळात त्यांना विशेष सेवा पदक, आंतरिक सुरक्षा पदक , पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह सन्मानित करण्यात आले आहे. आजपर्यंतच्या सेवा कालावधीत डीवायएसपी गजानन भातलवंडे यांना ६५० बक्षिसे आणि ५१ प्रशंसापत्र मिळालेली आहेत. त्याची या खात्यात वेगळी ओळख असून “खाकीतील” चांगला माणूस”अशीच त्याची ओळख आहे.
।। लातूर पोलीस अधीक्षक गजानन भातलवंडे (गृह), यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक राजभवन मुंबई येथे ७ जून रोजी एका शानदार शासकीय कार्यक्रमात प्रदान करण्यात आले डीवायएसपी भातलवंडे यांच्या सेवा कार्यात त्याच्या पत्नी सुषमा याचे मोठे पाठबळ व सावली मिळाली आहे धाकटे बंधू पांडुरंग भातलवंडे नांदेड येथे एलआयसी चे वरिष्ठ अधिकारी तर सर्वात लहान बंधू मनोज भातलवंडे परभणी येथे माध्यमिक पे युनिट चे अधीक्षक आहे मुलगा व मुलगी आयटी इंजिनिअर आहेत मुलगी नामांकित कंपनीत नौकरीला आहे
लोह्याचे भूमिपुत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक भातलवंडे यांनी पोलीस दलात आपल्या कार्याची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे मदतीला धावून जाणारे अधिकारी आहेत .त्याच्या यशा बद्दल माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर ,माजी आ रोहिदास चव्हाण,माजी नगराध्यक्ष ब कल्याणराव सुर्यवंशी, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, माजी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, वसंतराव पवार, छत्रपती धुतमल सहायक कुलसचिव पद्माकर पाटील,दता वाले, प्रा डॉ डि एम पवार शरद पाटील, हरिभाऊ चव्हाण, सोनू संगेवार, दिनेश तेललवार, वर्गमित्र सुनील धुतमल, दीपक भातलवंडे हरिहर धुतमल, विजय चन्नावार, पांडुरंग रहाटकर, प्रकाश जिरेवार,हणमंत पवार, यासह मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button