श्री संत शिरोमणी सेना महाराज मंदिरासाठी महंत उद्धवजी महाराज यांनी दिली एक्कावन्न हजाराची देणगी…
श्री संत शिरोमणी सेना महाराज मंदिरासाठी महंत उद्धवजी महाराज यांनी दिली एक्कावन्न हजाराची देणगी..
नेवासा प्रतिनिधी– नेवासा येथील पतंजली पार्क प्रांगणात सुरू असलेल्या नियोजित श्री संत शिरोमणी सेना महाराज मंदिरासाठी सदगुरू नारायण गिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांनी एक्कावन्न हजाराची देणगी देऊन धर्मकार्याला हातभार लावला आहे.
नेवासा येथील पतंजली पार्क मध्ये श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या मंदिराचे बांधकाम सुरू आहे.लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवगड देवस्थानचे महंत शांती ब्रम्ह गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व संत मंडळींच्या अधिपत्याखाली सुरू झालेल्या श्री संत शिरोमणी सेना महाराज मंदिराच्या उभारणीने तीर्थक्षेत्र नेवासा नगरीच्या वैभवात भरच पडणार आहे.या मंदिराच्या सर्व बांधकामाची व व्यवस्थापनाची जबाबदारी सर्व संत मंडळींनी वारकरी संप्रदायातील गायनाचार्य हभप सचिन महाराज पवार यांच्याकडे दिली आहे.
मंदिर निर्माण करण्यासाठी अहोरात्र पायाला भिंगरी बांधून युवा किर्तनकार ह.भ.प.सचिन महाराज पवार व त्यांचे सहकारी हे निधी संकलित करत आहे.यासाठी वारकरी संप्रदायातील सर्वसामान्य सेवेकरी वारकरी पुढे येऊन खारीचा वाटा मंदिर निर्मितीसाठी देत आहे.नेवासा तालुक्यातील नेवासा बुद्रुक शिवारात सुरेगाव रस्त्यावर महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक यांनी देखील भक्तांच्या पाठबळावर सुरू असलेल्या सदगुरू नारायणगिरीजी महाराज आश्रमाच्या वतीने किर्तनांतून आलेल्या मानधनातून एकावन्न हजाराची देणगी मंदिर बांधकामासाठी दिली.याबद्दल मंदिर व्यवस्थापन कमिटीने त्यांना धन्यवाद देत आभार मानले आहे.
श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या मंदिर निर्मिती कार्यास गती मिळण्यासाठी दात्यांनी सढळ हाताने देणगीच्या रूपाने मदतीसाठी पुढे यावे व मंदिर निर्माण कार्यास गती देण्यासाठी पुढे यावे यासाठी मोबाईल क्रमांक 75 88 47 37 21 व 97 66 69 40 04 यावर संपर्क साधावा असे आवाहन मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष गायनाचार्य युवा कीर्तनकार ह.भ.प.सचिन महाराज पवार यांच्यासह मंदिर निर्माण व्यवस्थापन समिती सेना महाराज भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे