Homeआपला महाराष्ट्रचालू घडामोडीराजकारण
भाजपचा मानवतला आनंदोत्सव साजरा
भाजपचा मानवतला आनंदोत्सव साजरा
मानवत प्रतिनिधी – भारताच्या प्रधानमंत्री पदी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर रविवारी ता ९ रात्री ७ च्या सुमारास तालुका भाजपच्या वतीने फटाके फोडीत मिठाई वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आला .
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोरील चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत एकमेकांना मिठाई भरवत आनंदोत्सव साजरा केला .
यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष विकास मगर, शहराध्यक्ष नागनाथ कुऱ्हाडे, प्रकाश मगर, अशोक मगर, रामेश्वर सोळंके, तूळशीराम सामसे, अमोल कुऱ्हाडे, गणेश शर्मा, अमरनाथ धायगुडे, मुंजाभाऊ सत्वधर, उमेश गाडगे, अमोल गायके, मारोती तिथे, नंदू कच्छवे, रवी वाघमारे, शुभम चव्हाण आदीजण उपस्थित होते .