आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रधार्मिक वार्तासंपादकीय लेक

आर्य वैश्य ऑफिशियल अँड प्रोफेशनल असोसिएशन च्या वतीने संस्थापक सचिव कै.प्रा. सुनील वट्टमवार यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

आर्य वैश्य ऑफिशियल अँड प्रोफेशनल असोसिएशन च्या वतीने संस्थापक सचिव कै.प्रा. सुनील वट्टमवार यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन…..

आर्य वैश्य ऑफिशियल अँड प्रोफेशनल असोसिएशन उदगीर च्या वतीने संस्थापक सचिव कै.प्रा. सुनील वट्टमवार यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन माननीय सिद्धेश्वर (मुन्ना)पाटील मा.सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी AVOPA या संघटनेचे विविध उपक्रमांची समाजाला आवश्यकता आहे. समाज उपयोगी कार्य करण्यासाठी ही संघटना तयार आहे. बाल वाचनालय,विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य, निराधार नागरिकांना किराणा घरपोच वितरण या सर्व योजनांच्या माध्यमातून ही संघटना समाजसेवा करीत आहे. यांचे कार्य उल्लेखनीय आहे.या विविध उपक्रमासाठी 51 हजार रुपये देणगी या संघटनेला श्री सिद्धेश्वर (मुन्ना)पाटील यांनी दिली आहे. तसेच विजयकुमार भीमाशंकर पारसेवार यांनी साऊंड सिस्टिम संच भेट दिला व यास संध्या सुनील वट्टमवार यांनी पाच हजार रुपयाची देणगी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष श्री बाळकृष्ण मुक्कावार, प्रमुख अतिथी श्री सिद्धेश्वर( मुन्ना)पाटील ,श्री प्रल्हाद बोथीकर ,विजयकुमार पारसेवार,संदीप मोदी, प्रा डॉ दीपक चिद्दरवार, संजय चन्नावार , विजयकुमार गबाळे, राकेश पांपट्टीवार, ज्ञानेश्वर पारसेवार, बालाजी बुन्नावार, अनिरुद्ध मुक्कावार, अनिल मारमवार, संजय पत्तेवार, शंकर मुक्कावार, बालाजी पत्तेवार ,देविदास पारसेवार, संतोष मुर्के ,विठ्ठल बावगे, व्यंकटेश पारसेवार यांनी परीश्रम घेतले. प्रास्ताविक प्रा डॉ दीपक चिद्दरवार ,सूत्रसंचालन विजयकुमार गबाळे व आभार प्रदर्शन प्रा. संजय चन्नावार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button