खा.अशोकराव चव्हानांच्या भाजपा प्रवेशानंतरही चिखलीकरांचा पराभव: काँग्रेसची रणनीती ठरली प्रभावी
खा.अशोकराव चव्हानांच्या भाजपा प्रवेशानंतरही चिखलीकरांचा पराभव : काँग्रेसची रणनीती ठरली प्रभावी
***************
(भोकर – बी.आर.पांचाळ)-लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर भोकर विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन आमदार माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा व आमदारकीचा राजीनामा देऊन दुसऱ्याच दिवशी भाजपात प्रवेश केला आणि ते भाजपाकडून राज्यसभेवर खासदार झाले त्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर हे सहजरीत्या निवडून येतील अशी मोठी आशा पक्षाला होती मात्र मतदारांना अशोकराव चव्हाण यांचा भाजपा प्रवेश पचनी पडला नाही,उमेदवारा बाबत प्रचंड नाराजी होती,अशोकराव चव्हाण यांची जादू चालली नाही,मतदारांनी मात्र काँग्रेस पक्षाचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन भाजपाला व खासदार अशोकराव चव्हाण यांना मोठा धक्काच दिला काँग्रेसचा बालेकिल्ला मात्र शाबूत राहिला.
भोकर विधानसभा मतदारसंघ 2009 साली बदलला भोकर,अर्धापूर,मुदखेड असा मतदार संघाचा विस्तार झाल्याने 15 वर्ष या मतदारसंघावर अशोकराव चव्हाण यांची सत्ता होती त्यांना याच मतदार संघाने मुख्यमंत्री बनवले त्यानंतर मंत्री झाले खासदार झाले हा मतदारसंघ त्यांनी काँग्रेसचा बालेकिल्लाच बनवला होता, जिल्हा परिषद,पंचायत समिती,बाजार समिती अशा स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचीच बहुमताने सत्ता होती त्यांनी मोठ्या प्रमाणावर या भागात या निधी खेचून आणून विकासाची कामे केली 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या भागातील मतदारांनी काँग्रेस पक्षातील त्यांच्या जवळ असलेल्या कार्यकर्त्यांच्या वागणुकीमुळे त्यांचा पराभव करून भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना निवडून दिले पुन्हा विधानसभेला अशोकराव चव्हाण यांना प्रत्येक गावात मतदाराकडे जाऊन माझं काय चुकलं सांगा असे म्हणून भावनिक आवाहन करावे लागले तेव्हा मतदारानी पुन्हा त्यांना विधानसभेला निवडून दिले सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद त्यांना मिळाले होते.
खा.अशोकराव चव्हाण रोखू शकले नाहीत चिखलीकरांचा पराभव
****************
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव झाला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपा मध्ये प्रवेश केल्याने त्यांचाच बालेकिल्ला असणाऱ्या मतदारसंघांमध्ये भाजपाचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल असे पक्षश्रेष्ठींना वाटले परंतु प्रत्यक्षात चिखलीकर यांच्या विरोधात मतदारांची प्रचंड नाराजी होती त्यांना मागील निवडणुकीत निवडून दिल्यानंतर त्यांनी लोकांचा संपर्क ठेवला नाही,कुठल्या विकास निधीची कामे केली नाहीत आणि पुन्हा लोकसभा निवडणूकीसाठीच आले महाराष्ट्रात व देशभरात भाजपाकडून पक्ष तोडा फोडीचे राजकारण झाले ते सुद्धा जनतेला आवडले नाही, महागाई बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक प्रश्न बाबत जनतेची नाराजी होती या सर्व बाबींना अशोकराव चव्हाण यांना देखील रोखता आले नाही, सत्ताधारी भाजपा पक्ष असून देखील योग्यरीत्या प्रचार यंत्रणा राबता आली नाही उलट काँग्रेस पक्षाचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या बद्दल लोकांच्या मनात सहानुभूती तयार झाली5 लाख 28 हजार 894 मध्ये त्यांना मिळाली तर भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांना 4 लाख 69 हजार 452 मते मिळाली 59 हजार 442 मते अधिक घेऊन वसंतराव चव्हाण विजयी झाले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपाची वाट अवघड असे चित्र दिसून येत आहे