Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताधार्मिक वार्ताराजकारणसामाजिक कार्य
गणपती बाप्पा मोरया …. पुढच्या वर्षी लवकर या….म्हणत विसर्जन मिरवणूक शांततेत ;
गणपती बाप्पा मोरया …. पुढच्या वर्षी लवकर या….म्हणत विसर्जन मिरवणूक शांततेत ;
१०५ गणेश मंडळ सुनेगाव तलावात विसर्जन नगर पालिका, पोलीस प्रशासनाची यंत्रणा
१०५ गणेश मंडळ सुनेगाव तलावात विसर्जन नगर पालिका, पोलीस प्रशासनाची यंत्रणा
——————
लोहा प्रतिनिधी : गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…म्हणत मोठ्या उत्साही वातावरणात डीजे चा आवाज न करता लोहा शहर व तालुक्यातील गणेश मंडळाने मिरवणूक काढत श्री चे विसर्जन केले.बालगोपाल तसेच तरुणाई ढोल ताशा वर थिरकली.शहरात माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर याच्या वतीने युवा नेते दीपक कानवटे यांनी खिचडी वाटप केली तर जुन्या शहरातील प्रसिद्ध गणेश मंदिरातील गणरायाच्या प्रतिमेची शेवटची आरती माजी आ रोहिदास चव्हाण यांच्या उपस्थितीत झाली.तहसीलदार परळीकर, डीवायएसपी डॉ अश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यासह पालिका प्रशासन, विद्युत मंडळ पोलीस यंत्रणा यांनी मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी प्रयत्न केले
शहरात गणेशोत्सव काळात कोणतेही कार्यक्रम गेल्या आठ दहा वर्षां पासून होत नाहीत तीच परंपरा यंदाही होती. शहरात ३७ मंडळ होते त्यात २६ गणेश मंडळ अधिकृत मान्यता घेतलेले होते. हद्दीत एकूण ६८ मंडळ होते १०५ गणेश मंडळाची नोंद होती त्याचे विसर्जन शांततेत पार पडले शहरातील गणेश विसर्जन सुनेगाव तलावात ते ग्रामीण भागात त्या त्या गावात परंपरागत पद्धतीने झाले. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर व टीमने दहा दिवस घेतलेली मेहनती मुळे यंदा जुगार, पते यावर आळा बसलेला दिसला सकाळ पासूनच गणेश मंडळा ने आपल्या सोयीनुसार गणेश विसर्जन केले.
तहसीलदार परळीकर, नायब तहसीलदार अशोक मोकले, कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड, वीज वितरण कंपनीचे अभियंता श्री स्वामी यासह नगर पालिका व पोलिसांनी विसर्जन शांततेत पार पडावे म्हणून काळजी घेतली
जुन्या शहरात माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी नवसाला पावणाऱ्या प्रसिद्ध गणपती रायची आरती केली केशवराव मुकदम ट्रस्ट चे अध्यक्ष हरिभाऊ चव्हाण यासह गावातील मान्यवर उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी याच्या गल्लीतील गणेशमूर्ती सर्वात मोठी व उंच होती त्या मिरवणुकीत मोठी गर्दी झाली होती सर्व गणेशमूर्तीचे विसर्जन वेळेत पार पडले.
चिखलीकरानी केला गणेश मंडळाचा सत्कार
–——————
लोहा शहरातील गणेश विसर्जन काळात मंडळाच्या अध्यक्षा चा माजी खा प्रतापराव पाटील यांच्या वतीने याही वर्षी सत्कार करण्यात आला दीपक पाटील कानवटे याच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला उद्घाटन युवा नेते सचिन पाटील चिखलीकर यांनी केले यावेळी ,माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, पोलीस निरीक्षक चिंचोलकर ,केशवराव मुकदम माजी सभापती आनंदराव शिंदे माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले, छत्रपती धुतमल, भास्कर पाटील पवार, हरिभाऊ चव्हाण दिनेश तेलालवर नारायण येलरवाड, मिलिंद पाटील पवार, नरेंद्र गायकवाड, सचिन मुकदम, बाळु पाटील बाबर सूर्यकांत पाटील गायकवाड, अविनाश पाटील पवार, भारत पाटील कदम, व्यंकट जंगले, बाळू पाटील पवार, संदीप जाधव संग्राम पाटील जाधव संदीप पवार मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते..