नांदेड लोकसभा क्षेत्राचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन
नांदेड लोकसभा क्षेत्राचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन
***********************
राजकारणातील संघर्ष योद्धा हरवला
**********
नांदेड (बी.आर.पांचाळ)
नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजकीय व सामाजिक क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्व वसंतराव बळवंतराव चव्हाण (70)यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
कै. खा.वसंतराव बळवंतराव चव्हाण यांनी नायगाव ग्राम पंचायती पासून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली,25 वर्ष सरपंच राहून त्यांनी गावाचा विकास साधला त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य राहिले,विधान परिषदेवर त्यांनी6 वर्ष काम केले, दोन वेळा विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षही ते राहिले लोकसभा निवडणुक 2024 ही मोठ्या अटीतटीची झाली आपल्या वृद्धापकाळात देखील त्यांनी मोठ्या ताकदीने लोकसभा निवडणूक जिंकली काही दिवसापूर्वी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी हैदराबाद येथे हलविण्यात आले होते उपचार सुरू असतानाच 26 ऑगस्ट रोजी त्यांचे दुःखद निधन झाल्याने राजकीय क्षेत्रामध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून त्यांचा मोठा नावलौकिक झालेला होता, सामाजिक धार्मिक क्षेत्रांमध्ये सुद्धा त्यांनी मोठे योगदान दिलेले होते,जनतेने ह्या नेतृत्वाला मोठ्या आनंदाने स्वीकारले होते मात्र नियतीपुढे कोणाचे काहीच चालत नाही अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाला जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली