आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताधार्मिक वार्तासामाजिक कार्य

भारतीय संस्कृतीमध्ये आई-वडिलांना देवाचं स्थान आहे-

भारतीय संस्कृतीमध्ये आई-वडिलांना देवाचं स्थान आहे-********************

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे
*************

भोकर ( तालुका प्रतिनिधी) भारतीय संस्कृतीमध्ये आई-वडिलांची पूजा केली जाते,त्यांना देवाचं स्थान आहे मात्र आजकाल अनेक आई-वडिलांची वाईट अवस्था आहे मूलबाळं त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत,त्यांच्या अनेक समस्या आहेत महाराष्ट्र शासनाने वयोवृद्धांसाठी वयोश्री योजना व मुख्य मंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली असून सदर योजनेचा अधिक अधिक वृद्ध मंडळींनी लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मीनगिरे यांनी भोकर येथे कार्यक्रमात बोलताना मांडले.
भोकर येथील विश्वकर्मा मंदिरात विश्वकर्मा प्रतिष्ठान व युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने सहाय्यक आयुक्त शिवानंद निमगिरे यांना लोकशाही मराठी वृत्तवाहिनीच्या वतीने उत्कृष्ट अधिकारी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले त्या संदर्भाने भोकर येथे विश्वकर्मा समाज मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महंत परमेश्वर महाराज शिरंजनीकर हे होते यावेळी पुढे बोलताना सहाय्यक आयुक्त मीनगिरे म्हणाले, अनेक वर्षापासून सुतार समाज गावगाड्यातील मंडळी सोबत नम्रपणे राहून काम करीत होता मात्र म्हणावी तशी समाजाची प्रगती झाली नाही,आता समाजातील युवकांनी पुढे येऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा,ओबीसीसाठी महामंडळ स्थापन करण्यात आले असून त्यामध्ये अनेक योजना आहेत उद्योगासाठी कर्जही दिल्या जाते, योजनेचा फायदा घेऊन समाजाने उन्नती साधावी असे सांगून भारतीय संस्कृतीमध्ये आई-वडिलांना देवाचे स्थान आहे मात्र आजकालची मूलबाळ आई-वडिलां कडे लक्ष देत नाहीत त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली असून त्याचा सर्व वयोवृद्ध नागरिकांनी अधिक अधिक लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक पत्रकार बी.आर.पांचाळ यांनी केले,बालाजी खर्डे पाटील, बालाजी राठोड,एड.परमेश्वर पांचाळ,बाबुराव उमरीकर, सत्यनारायण जुनीकर,बालाजी नारलेवाड यांनी मनोगत व्यक्त केले वयोश्री योजना व तीर्थ दर्शन योजनेचे अर्ज यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात भरून घेण्यात आले दत्तात्रय पांचाळ,मनोज पांचाळ,डॉ.किरण पांचाळ, भगवान पांचाळ,राजू पांचाळ,महेश पांचाळ,विठ्ठल सुरलेकर,गोविंद सोमठाणकर यांच्यासह सर्व विश्वकर्मा समाज बांधवांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button