भोकर तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी मारोती भोंबे उपाध्यक्ष राघोबा पा. सोळंके
भोकर तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी मारोती भोंबे उपाध्यक्ष राघोबा पा. सोळंके
****************
भोकर(तालुका प्रतिनिधी)
भोकर तालुका सरपंच संघटनेची नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून सरपंच संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी मारोती भोंबे यांची तर उपाध्यक्षपदी राघोबा पाटील सोळंके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सरपंच संघटनेचे यापूर्वीची कार्यकारिणी अध्यक्ष माधव अमृतवाड असलेली बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर 19 ऑगस्ट रोजी हॉटेल गणराज रिसॉर्ट येथे सरपंचांची बैठक घेऊन नूतन कार्यकारीनी निवडण्यात आली यावेळी बिनविरोध निवड करण्यात आली अध्यक्षपदी मारोती भोंबे, उपाध्यक्ष राघोबा पा. सोळंके, सचिव मोहन राठोड सहसचिव दिलीप भोळे सल्लागार सुरेश पा. कल्याणकर, आनंदराव पा. रावणगावकर, जयवंतराव खूपसे, रमेश संगपवाड, सत्यनारायण कांबळे आदींची निवड करण्यात आली यावेळी सभापती जगदीश पाटील भोसीकर, भाजपा तालुका अध्यक्ष गणेश पा. कापसे, किशोर पाटील लगळूदकर, उपसभापती बालाजी शानमवाड, संचालक रामचंद्र मुसळे, अत्रिक पा. मुंगल, उज्वल केसराळे, दिलीपराव सोमठाणकर, राजेश अंगरवार, केशव पा.पोमनाळकर आदींची उपस्थिती होती नूतन कार्यकारिणीचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले