सोयाबीन नुकसान भरपाई पासून अनेक शेतकरी वंचित.
सोयाबीन नुकसान भरपाई पासून अनेक शेतकरी वंचित.
गुडसुर प्रतिनिधी : येथील अनेक शेतकरी सोयाबीन व कापूस या पिकाच्या नुकसान भरपाई पासून वंचित राहत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सोयाबीन व कापसासाठी हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टर पर्यंत मदतीची घोषणा केली म्हणून याबाबतीतील शेतकऱ्यांकडून बँकेचे पासबुक व आधार कार्ड मागवून घेण्यात येत आहेत पण ही नुकसान भरपाई त्यांनाच मंजूर आहे ज्यांनी ई.पिक पाहणी केली अनेक शेतकरी हे अशिक्षित आहेत त्यांच्याकडे मोबाईल नाही अशा अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्यामुळे या भागातील शेतकरी शासनाच्या या निर्णयामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत एकीकडे लहरी निसर्गात तर दुसरीकडे जाचक अटी लागणारे सरकार यामुळे अडचणीत सापडलेले शेतकऱ्यांना नेमके तारणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे
ई. प्रमाणपिक पाहणीची अट वगळून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी अशी मागणी या भागातील शेतकरी करत आहेत