तरोडा (बु) केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्नः
तरोडा (बु) केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्नः
नांदेड प्रतिनिधी – पारसेवार शैक्षणिक वर्ष 2024-25 यातील पहिलीच केंद्रीय शिक्षण परिषद माहे ऑगस्ट दि-19/8/2024 रोजी गोकुळधाम इंटरनॅशनल स्कूल, येथे संपन्न साली केंद्रप्रमुख आ. विजयकुमार धोंडगे साहेब यांच्या नियोजनानुसार तरोडा (बु.) केंद्राची ही शिक्षक परीषद सर्व विषयपूरक घेण्यात आली, ज्याची श्री धोंडग साहेब (केंद्रप्रमुख) यांनी प्रस्तावना करून सुरवात केली.
प्रसंगी श्री ज्ञानेश्वर कल्याणकर सर , श्री पारसेवार सर व सौ. सारिका आचमे मॅडम या साधनव्यक्तींनी निपुण भारत, FLN, ग्रंथालय पुस्त निर्मिती, ASR, PGI, NAS, गुणवत्ता विकास अभियान,इनस्पायर अवार्ड आदीचे सविस्तर माहिती दिली. केंद्रीय मुख्याध्यापक तोडे व सर्व केंद्रा अंतर्गत सर्व मुख्याध्यापक , शिक्षक यांच्या सहकार्यातून शिक्षण परिषद पार पडली, गोकुळ धाम शाळेचे संचालक शर्मा यांनी सर्व व्यवस्था चांगली केली. त्यांचे व नवनियुक शिक्षकांचे त्याप्रसंगी स्वागत करण्यात आले. एकंदरीत तरोडा (बु.) केंद्राची पहीलीच शिक्षण परीषद नव्या उमेदीत सर्व शिक्षकांनी वेध प्रशिक्षणाच्या अनुषंगाने काम करण्याचे ध्येय पुढे ठेवत, नवीन अनुभव घेत आव्हान स्वीकारले केंद्रातील, श्री राठोड सर , श्री पोवाडे सर, आदींनी स्वतः चे अनुभव देखील मांडले.
शेवटी समारोप केंद्रीय मुख्याध्यापक तोडे सरांनी केले.