भोकर तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुका सचिव पदी एम. ए. रजाक शेठ
*************
भोकर (तालुका प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नांदेड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बी. आर. कदम यांच्या आदेशानुसार भोकर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदा बाबा गौड पाटील यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करून त्यांना पत्र दिले.
भोकर तालुका काँग्रेस पक्ष कार्यालयात 6 ऑगस्ट रोजी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये तालुक्यातील कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले काँग्रेस पक्षाच्या तालुका सचिव पदी एम. ए. रजाक सेट प्रेस वाले यांची नियुक्ती करण्यात आली रजाक सेठ यांनी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी लोकसभा निवडणुकीत यशस्वीपणे काम केले सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊन पक्षाचे ध्येय धोरणे समजावून सांगितले त्यांच्या कार्याचे दखल घेऊन त्यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आले त्यासोबतच इतर कार्यकर्त्यांच्या देखील नियुक्त करण्यात आल्या यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पा. रावणगावकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पा. किन्हाळकर, निळकंठ वर्षवार सचिव भीमराव दुधारे, शहराध्यक्ष तौसीफ इनामदार, शेख मुजीब शफी इनामदार, अफरोज खान हमीद पठाण महिला अध्यक्ष विजयालक्ष्मी करेमगर, सुरेखा माळे, शिवाजी देवतळे आदींची उपस्थिती होती