पोलीसपाटलांनी नविन फौजदारी कायद्याची माहिती करून घ्यावी
सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांचे प्रतिपादन.
उस्माननगर – गणेश लोखंडे -“सन.२०२३ मधे संसदेत मंजूर करण्यात आलेले तीन नविन फौजदारी कायदे दि.१जूलै.पासुन अमलात येत आहेत .त्याची माहिती सर्व पोलीस पाटलांनी करून घ्यावी. ” असे प्रतिपादन उस्माननगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांनी केले.उस्माननगर पोलिस ठाण्याचे हद्दीतील पोलीस पाटलांच्या कायदेविषयक मार्गदर्शन बैठकीत ते बोलत होते.
“नविन संमत झालेले तीन कायदे भारतीय न्यायसंहीता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता,आणि भारतीय साक्ष अधिनियम, या प्रमाणे संबोधले जातील . पोलीस पाटलांनी आपल्या कार्यक्षेत्रात घडणा-या घडामोडींची माहिती पोलिसांना तात्काळ देत जावी माहिती देतांना कुणाएकाची बाजु घेउ नये”, असे ते म्हणाले.
“आम्लीपदार्थ अधिनियम, पोक्सो कायदा , अनोळखी व्यक्तींच्या संदर्भात कार्यवाही-” यावर श्री..पवार यांनी माहिती दिली. बैठकीला कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.