१२ वी राज्यस्तरीय ट्रॅडिशनल रेसलिंग क्रीडा स्पर्धेत नांदेड जिल्ह्याचा तृतीय क्रमांक
आमळनेर येथे संपन्न झालेल्या १२ वी राज्यस्तरीय ट्रॅडिशनल रेसलिंग क्रीडा स्पर्धेत नांदेड जिल्ह्याचा तृतीय क्रमांक
****************
भोकर (तालुका प्रतिनिधी)
प्रताप कॉलेज अमळनेर, जिल्हा जळगाव येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय ट्रॅडिशनल रेसलिंग क्रीडा स्पर्धेत विविध जिल्ह्यामधून नांदेड जिल्ह्याला तृतीय क्रमांकाचा मान मिळाला यातील सर्व खेळाडूंनी उत्कृष्टरित्या प्रदर्शन करून गोल्ड १४ पदक, सिल्वर ७ पदक, ब्रांझ ६ पदक प्राप्त करून जिल्ह्याला तृतीय क्रमांकाचा मान मिळवून दिला या मिळालेल्या यशाबद्दल या सर्व खेळाडूंचे तसेच सर्व प्रशिक्षकांचे पंचांचे सार्वत्रिक कौतुक केले जात आहे, विजय खेळाडूंचे नावे खालील प्रमाणे प्राजक्ता इंगोले, )जीवन थोरात, श्रेयश वानोळे,)यश वागतकर,)साक्षी हानवते,)सोनाक्षी हनवते, किंजल थोरात, अवंतिका कोरेवाड,) अश्विनी चव्हाण,)रोहन कसबे, ) अस्मिता कसबे, अथर्व गोरठकर,) असलम शेख, आयुष वाघमारे, नवीन पंच परीक्षा कु. वैष्णवी येळगे, व अश्विनी चव्हाण या दोन मुलींनी दिली तसेच मुलींच्या संघासोबत महिला प्रशिक्षक म्हणून कु.सलोनी विनोद सुरदसे तर हे सर्व स्पर्धा मुख्य प्रशिक्षक बालाजी एल. गाडेकर, एड. निलेश पावडे अध्यक्ष ट्रॅडिशनल बेल्ट रेसलिंग असोसिएशन नांदेड जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली खेळत होते विजय सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले यावेळी संघटनेचे पदाधिकारी कुलकर्णी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन व पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या