सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताधार्मिक वार्तासामाजिक कार्य

हिंदू समाजाच्या एकत्रीकरणासाठी संघाची स्थापना सिद्धेश्वर बिराजदार यांचे प्रतिपादन

हिंदू समाजाच्या एकत्रीकरणासाठी संघाची स्थापना सिद्धेश्वर बिराजदार यांचे प्रतिपादन

मानवत प्रतिनिधी
हिंदू समाजाच्या संघटन व एकत्रिकरणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवकाची संघाची स्थापना डॉ हेडगेवार यांनी काही सोबत्यांना घेऊन केली असून संघाचे स्वयंसेवकांचे पथसंचलन हे समाजाला आत्मविश्वास देण्यासाठी आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत धर्म जागरण प्रमुख सिद्धेश्वर बिराजदार यांनी केले.
येथील माहेश्वरी भवन मंगल कार्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शुक्रवारी ता 28 आयोजित गुढीपाडवा उत्सव कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.


कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून यशवाडी येथील त्रिमूर्ती हनुमान संस्थांनचे अध्यक्ष स्वामी शिवेंद्र चैतन्य, चैतन्योदय गुरुकुल आश्रम जिंतूर चे स्वामी महेशानंद पुरी, जिल्हा संघचालक ऍड मुकुंदराव चौधरी, तालुका संघचालक वैभव पोकळे उपस्थित होते.
यावेळी स्वामी शिवेंद्रचैतन्य यांनी सांगितले की, इतर धर्माप्रमाणे आपल्या हिंदू समाजात एकी राहिली नसून आपण जाती जातीत विभागला गेलो आहोत. इतर धर्म सारखी कट्टरता आपल्या अंगात आणखीन भिनली नाही. त्यासाठी शाळेतच धार्मिक शिक्षण देणे गरजेचे झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button