स्वामी आई सेवाभावी संस्थेच्या वतीने फराळाचे वाटप
स्वामी आई सेवाभावी संस्थेच्या वतीने फराळाचे वाटप
मानवत सौ ममता चिद्रवार – सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मानवत येथील स्वामी आई सेवाभावी संस्थेच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने उपवासाच्या साहित्याचे वाटप बुधवारी ता १७ येथील विठ्ठल मंदिरात भक्तांना करण्यात आले .
शहरातील कापड बाजार चौकातून विठ्ठल मंदिरापर्यंत विठ्ठलनामाच्या गजरात दिंडी काढण्यात आली . यामध्ये पाऊली, फुगडी, हरिपाठ पठण करण्यात आली .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्षा सविता कत्रूवार, उपाध्यक्ष – माधुरी कत्रूवार, सहसचिव अमृता रतकंठवार, कोषाध्यक्ष दीपा मोदी, सिद्धलक्ष्मी गुंडाळे, अश्विनी रुद्रकंठवार यांनी प्रयत्न केले .
दिंडीत सारिका रतकंठवार, शामल चिद्रवार, वर्षा कत्रुवार, सुचिता पेंसलवार, जयश्री रुद्रवार , संगीता रुद्रवार, संगीता रुद्रवार, दीपाली मोदी , पुष्पा कत्रुवार, अमृता रतकंठवार, अरुणा चांडक, भारती वर्मा, जना रेवणवार, ज्योती गुंडाळे, निर्मला गुंडाळे, शीतल पदमवार, मनीषा रुद्रवार, शीतल मंत्री, मेघा तापडिया सामील झाल्या होत्या .