आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeग्रामीण वार्ताराजकारणशेती विषयी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा

मानवत तालुका प्रतिनिधी – मानवत ते पाळोदी रस्त्याचे काम दर्जेदार व लवकर करा अन्यथा रास्तारोको करण्याचा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा इशारा गेल्या काही महिन्यापासून रखडलेल्या मानवत ते पाळोदी या रस्त्याचे काम दर्जेदार व त्वरित सुरू करावे अन्यथा याप्रश्नी रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी ता १२ जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे .


मानवत शहराला जोडणारा परभणी ते पाळोदी व मानवत हा मार्ग असून या मार्गावर तालुक्यातील बहुतांश गावे आहेत . परंतु या रस्त्याची दुर्दशा झाली असल्याने या भागातील ग्रामस्थांसाह वाहनधारकांना मोठा त्रास अनेक दिवसांपासून सोसावा लागत आहे . या मार्गावरील मानवत ते सावळी असे ९ किमी च्या रस्त्याचे काम काही दिवसांपासून रखडले असून या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून सदरील काम दर्जाहीन होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे . सदरील रखडलेले काम दर्जेदार व लवकरात लवकर करावे अन्यथा या प्रश्नी सावळी पाटीवर अशी मागणी गुरुवारी ता २० रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे .
निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे , नामदेव काळे , गोपाळ काळे , महादेव काळे , विठ्ठल चोखट , सूरज पाटील , नितीन काळे , अर्जुन काळे , अशोक कदम , अण्णासाहेब चोखट , हनुमान मस्के यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button