सेवानिवृत्त संघटना सामाजिक बांधीलकी जोपासनारी संघटना – विजया घिसेवाड
सेवानिवृत्त संघटना सामाजिक बांधीलकी जोपासनारी संघटना – विजया घिसेवाड
भोकर : महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक अधिकारी कर्मचारी संघटना ही नेतेगिरी करणारी संघटना नाही तर निवृत्तांच्या प्रश्नांची सामाजिक बांधील जोपासून ते तात्काळ सोडवणारी राज्यातील बळकट संघटना असल्याचे प्रतिपादन संघटनेच्या जिल्हाध्यक्षा विजया घिसेवाड यांनी येथील सेवानिवृतांच्या बैठकीस मार्गदर्शन करतांना केले .
रविवार दि .११ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक अधिकारी कर्मचारी संघटना भोकर तालुका शाखेची सहविचार सभा विश्रामगृह येथे घेण्यात आली . यावेळी राज्य उपाध्यक्ष सुधिर गोडघासे , जिल्हा सरचिटणीस आर .डी . गोवंदे जिल्हा उपाध्यक्ष शेख एम . पी . जिल्हा महिला प्रतिनिधी श्रीमती एस .डी . निलेवार जिल्हा सल्लागार आर . एम . शेख ज्येष्ठ एम . ए . कदम , शेख एम . बी , शेख एम . व्ही . यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलतांना सेवानिवृत्ताची संघटना ही सामाजिक बांधीलकी जोपासणारी संघटना असल्याने सेवानिवृत्त मुस्लीम बांधव पवित्र हज येथे जाऊन आल्याने एच . एस पठाण व आर . एम . शेख यांचा शाल पुष्पहार देवून सत्कार करण्या आला . जुन , जुलै अखेर सेवानिवृत झालेले शिक्षक पांडूरंग कोकुलवार , सुभाष मोरे ,विलास राऊत , श्रीमती आय. एम . शेख , बालाजी आक्कलवाड यांचा सत्कार राज्य उपाध्यक्ष गोडघासे सुधिर यांच्या हस्ते करण्यात आला . तालुका अध्यक्ष सुरेश मुपडे यांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनाने बैठक संपवण्यात आली . प्रास्ताविक सुत्रसंचाल बी एस .सरोदे आभार विजय महाजन यांनी मानले