सांस्कृतिक विभाग मंत्रालय मुंबई शाखा भोकर तालुका अध्यक्षपदी बी.आर.पांचाळ, सचिवपदी देवकांबळे
सांस्कृतिक विभाग मंत्रालय मुंबई शाखा भोकर तालुका अध्यक्षपदी बी.आर. पांचाळ,सचिवपदी देवकांबळे
***************
भोकर( तालुका प्रतिनिधी) गायन,वादनक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या,कलावंतांसाठी राज्यस्तरावर लढा उभारणाऱ्या सांस्कृतिक विभाग मंत्रालय मुंबई,शासकीय,निमशासकीय संघटना अनु.जाती,जमाती,विमुक्त जाती,भटक्या जमाती,इतर मागासवर्गीय,इतर मागास प्रवर्ग या संघटनेच्या भोकर तालुका अध्यक्ष पदी पत्रकार बी.आर.पांचाळ यांची तर सचिव पदी के. वाय.देवकांबळे यांची निवड करण्यात आली.
भोकर येथे विश्रामगृहावर 24 सप्टेंबर रोजी तालुक्यातील कलावंतांची बैठक बोलाविण्यात आली होती प्रारंभी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर वडणे यांनी संघटनेच्या ध्येय धोरणाविषयी माहिती देऊन खऱ्या कलावंतांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले, विभागीय अध्यक्ष संगीतकार अंकुश चित्ते यांनी कलावंतांच्या विविध समस्या शासन स्तरावर मांडण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले त्यानंतर भोकर तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली अध्यक्ष पत्रकार बी.आर.पांचाळ, उपाध्यक्ष कमलबाई जाधव,सचिव के.वाय.देवकांबळे,सहसचिव धम्मानंद जाधव,कोषाध्यक्ष दत्ता पाटील गेंटेवार, सदस्य शाहीर बाबुराव गाडेकर,एन.के.कांबळे,सुनील मुनेश्वर, सुभाष टेकाळे,उत्तम एडके,सुरेश कसबे, हनुमंत वाघमारे, दिलीप कावळे,दत्ता पोटलेवाड,शोभाबाई गेंटेवार आदींची निवड करण्यात आली जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून पत्रकार बाबुराव पाटील यांचीही निवड करण्यात आली या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमोद कुमार गजभारे,जिल्हा कोषाध्यक्ष कृष्णा गजभारे,शाहीर माधव वाघमारे यांच्यासह तालुक्यातील कलावंत मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते