सराईत गुन्हेगार फिरोज उर्फ लखन अजित शेख यास स्थानबद्ध करण्यात आले.
सराईत गुन्हेगार फिरोज उर्फ लखन अजित शेख यास स्थानबद्ध करण्यात आले.
नेवासा प्रतिनिधी– सराईत गुन्हेगार फिरोज उर्फ लखन अजित शेख विरुध्द नेवासा पोलीस स्टेशनमध्ये दरोडा, जबरी चोरी (सोनसाखळी), दरोडा तयारी, दुखापत, चोरी घातक हत्यार कब्जात बाळगुन दहशत पसरवणे अशा विविध प्रकारचे गुन्हे दाखल असुन त्यास या गुन्हयांमध्ये वेळोवेळी अटक करण्यात आल्यानंतरही तो न्यायालयातून जामीनावर सुटताच पुन्हा भारतीय दंड विधान व मुंबई पोलीस कायदा अंतर्गत सराईतपणे गुन्हे करीत होता.त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पहाता तो व आपल्या सोबत असणाऱ्या गुंडां सोबत घातक शस्त्रे सोबत ठेवून लोकांवर दहशत व भिती निर्माण करीत होता.त्यास कायदयाचा अजिबात धाक राहिलेला नव्हता त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला मोठया प्रमाणात बाधा निर्माण होवून लोकांच्या मनात असुरक्षीतेची भावना तयार झाली होती.दिवसे दिवस वेगवेगळया तऱ्हेने गुन्हे करण्याची त्यांचे प्रवृत्ती बळावत असल्याने सर्व सामान्य लोकांच्या जिवीतास तो उपद्रवी बनला होता. त्यामुळे त्याचे विरुध्द महाराष्ट्र इ गोपडपटटी दादा, हात भटटीवाले औषधी विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती ( व्हीडीओ पायरेट ) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबत अधिनियम सन १९८१ नुसार “धोकादायक व्यक्ती” या संज्ञेत तो मोडत असल्याने त्याचे विरुध्द सदर कारवाई करणे आवश्यक होते.त्यानुसार नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांनी त्याच्या विरुध्द चौकशी पुर्ण करुन पोलीस अधिक्षक अहमदनगर राकेश ओला यांचे कडे प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाची पडताळणी करुन पोलीस अधीक्षक यांनी जिल्हादंडाधिकारी अहमदनगर यांचेकडे पाठविलेला होता.
त्यानुसार जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे कडील आदेश क्रमांक डी.सी.कार्या ९ क १ / ८२६ / २०२४ अहमदनगर दिनांक १४/०७/२०२४/ अन्वये सदर अधिनियमान्वये फिरोज उर्फ लखन अजिज शेख, वय ३० वर्षे, रा.नेवासा फाटा ता.नेवासा जि.अहमदनगर यास स्थानबध्दतेचे आदेश जारी केला.त्यानुसार पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर प्रशांत खैरे, उप विभागीय पो.अधिकारी शेवगाव सुनिल पाटील यांचे मागदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी व त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी दिनांक १४/०७/२०२४/ रोजी ताब्यात घेवून त्याची जिल्हादंडाधिकारी यांचे आदेशाप्रमाणे मध्यवर्ती कारागृह नाशिक याकारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे.
सदर कारवाई पो.नि.धनंजय अ. जाधव, पो.उप.नि.मनोज आहिरे, स.फौ.सुनिल जरे, पो.कॉ.वासुदेव डमाळे, पो.कॉ.नारायण डमाळे तसेच स्था.गु.शाखेचे पो.हे.कॉ.राम माळी, पो.हे.कॉ.राजेंद्र पांडे यांनी ही कारवाई केली.