श्री दुर्गामाता महादौडचे बँक कॉलनी नागरिकांतर्फे उत्स्फूर्त स्वागत
श्री दुर्गामाता महादौडचे बँक कॉलनी नागरिकांतर्फे उत्स्फूर्त स्वागत
वसमत… प्रतिनिधी..
वसमत शहरातील विविध भागात श्री दुर्गामाता महादौडचे आयोजन करण्यात आले असुन आज दिनांक 10 आक्टोबर रोज गुरुवारी या महादौड फेरीचे बँक कॉलनी येथे नागरिकांनी उत्साहात स्वागत केले.
स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर रांगोळी काढुन जागोजागी पुष्पवृष्टी व पुजन करून सहभाग घेतला. या महादौड रॅलीमध्ये तरुण, तरुणी, महिला, पुरुष यांच्यासह पाचशे पेक्षा जास्त नागरिक घोषणा देत सहभागी झाले होते.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्त नऊ दिवस ही फेरी वसमत शहरातील सोमवार पेठ येथुन निघुन वेगवेगळ्या भागात जागृती निर्माण करीत परत सोमवार पेठ येथे विसर्जन केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचे स्मरण व जनजागृती करण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले. शनिवारी दसरा मुहुर्तावर सकाळी 6.00 वाजता या कार्यक्रमाचा समारोप शिवतीर्थ, शिवाजी महाराज पुतळा येथे होणार असून यावेळी नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.