आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताराजकारणसरकारी योजना

श्री क्षेत्र ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे…

श्री क्षेत्र ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे…

नेवासा प्रतिनिधी – संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर नेवासा येथे जगाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली.पैसे खांबाच्या दर्शनासाठी हजारो भाविक भक्त येत असतात . पुढील काही दिवसा वरती आषाढी एकादशी व कमिका एकादशीच्या निमित्ताने मोठा उत्सव असतो एकादशी जवळ आली असून रस्त्यावरील व बाजूची साईट पट्टी अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाकडे दुर्लक्ष केलेले असून संस्थांकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. त्याचबरोबर नेवासा ते खडका फाटा रोड या रोडवर देखील खड्डे असल्याकारणाने येणाऱ्या दिंडी व पायी येणाऱ्या वारकऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार असून एकादशीच्या अगोदर या रस्त्यावर पडलेल्या खड्डे बुजवणे अत्यंत आवश्यक असून आपण लवकरात लवकर लक्ष घालून कामास सुरुवात करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष रोहित पवार यांनी केली आहे.यावेळी सार्वजनिक बांधकामा विभागाचे अधिकारी यांना निवेदन देऊन त्यांना समज देण्यात आली.यावेळी नगरसेवक सुनील वाघ, ओबीसी जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब शिरसागर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रतीक शेजुळ, कामगार मोर्चा तालुकाध्यक्ष विवेक नन्नवरे, शहर उपाध्यक्ष शंकर कनगरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष श्रीकांत बर्वे, युवा मोर्चा शहर सरचिटणीस किरण लष्करे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button