श्री केदार जगद्गुरु यांच्या श्रावणमास अनुष्ठान सोहळ्याची 4 सप्टेबर रोजी सांगता
श्री केदार जगद्गुरु यांच्या श्रावणमास अनुष्ठान सोहळ्याची 4 सप्टेबर रोजी सांगता
नांदेड,( बी. आर. पांचाळ) -श्री हिमवत् केदार वैराग्य सिंहासनाधिश्वर केदारनाथ रावल श्री श्री श्री 1008
श्री केदार जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य (उत्तराखंड) यांच्या 52 व्या श्रावण मास अनुष्ठान समाप्ती सोहळा बुधवार दि. 4 सप्टेबर रोजी होणार आहे.
हा श्रावण मास अनुष्ठान समाप्ती सोहळा गुरु दशमुख आश्रम भीमाशंकरनगर गोपाळचावडी नवीन नांदेड येथे होणार आहे. त्या अनुषंगाने 5 ऑगस्टपासून सुरु झालेल्या श्रावणमास अनुष्ठान कार्यक्रमनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांची मेजवाणी सुरु आहे. या निमित्ताने दि.4 सप्टेंबर रोजी सकाळी 8 दु.12 यावेळात इष्टलिंग महापुजा, दु.12 ते 2 यावेळात धर्मसभा आणि मान्यवरांचा सत्कार होणार आहे. त्यानंतर दु. 2 ते 6 यावेळात महाप्रसादाचा कार्यक्रम होइल. या सर्व कार्यक्रमाचा भक्तगणांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री गुरुदशमुखाश्रम गोपाळचावडी भक्तमंडळी यांनी केले आहे.