शेतीचे पंचनामे करून हेक्टरी ५० हजारांची मदत करा
मानवतला प्रशासनाकडे निवेदनाचा पाऊस
शेतीचे पंचनामे करून हेक्टरी ५० हजारांची मदत करा
मानवतला प्रशासनाकडे निवेदनाचा पाऊस
मानवत तालुका प्रतिनिधी
मानवत तालुक्यासह सर्व पाथरी विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून हेक्टरी ५० हजार प्रमाणे मदत करून पीक विमा कंपनीला सर्व्हे करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी आमदार सुरेश वरपूडकर यांचेसह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व संभाजी ब्रिगेड यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे .
मानवत तालुक्यासह पूर्ण पाथरी विधानसभा मतदारसंघात दोन दिवस अतिवृष्टी झाल्याने नदी , नाले व ओढ्याला पूर आल्याने विशेषतः त्यालागत शेतात पुराचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . शेतात असलेला सोयाबीन , कापूस , मूग , उडद , हळद व केळी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्वच पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांचे अनुदान देण्याची मागणी पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश वरपूडकर यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे सोमवारी ता २ तर माकपच्या व संभाजी ब्रिगेडच्या वतीने मंगळवारी ता ३ तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्याकडे देण्यात आले .
माकपच्या निवेदनावर लिंबाजी कचरे , बाबाराव आळणे , आसाराम दुधे , सरपंच अशोक कचरे , शिवाजी इंगळे , केशव खरात , गोविंद आळणे , लहू बारहाते यांच्या तर संभाजी ब्रिगेड च्या निवेदनावर गोविंद घांडगे , हनुमान मस्के , माऊली चांगभले , लक्ष्मण शिंदे , सुरज काकडे , सतीश काळे , राजाभाऊ शिंदे , ऍड मो लुकमान बागवान , नामदेव काळे , ऍड संतोष लाडाने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .
निवेदनाचा पाऊस
वरील निवेदनासोबत मंगळवारी ता ३ तहसील प्रशासनाकडे सेनेच्या माजी जिल्हा परीषद सदस्या मीरा मांडे , रुस्तुम मांडे , बाबासाहेब भदर्गे , कोंडीबा पाते , माणिक पिंपळे , शिवाजी हिंगे यांनी तर अन्य एक निवेदन शेतकरी माजी नगरसेवक शेषेराव दहे , ऍड श्याम कुऱ्हाडे , ऍड अरुण गोलाईत , बालाजी पांचाळ , भारत कच्छवे आदीनी दिले आहे .