शेतकरी बांधवांसाठी गोड बातमी
शेतकरी बांधवांसाठी गोड बातमी
वसमत. प्रतिनिधी. येथील पूर्णा सहकारी साखर कारखाना लि., वसमतनगर ने शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी दिली असुन त्यांनी पुर्णा सहकारी साखर कारखान्याला दिलेल्या ऊस बिलाचा तिसरा हप्ता बँक खात्यात वर्ग करण्यात आल्याचे कारखाना प्रशासनाने कळवले आहे. पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर पुर्णाच्या सर्व शेतकरी ऊस उत्पादक बांधवांना हि गोड बातमी मिळाली आहे.
पूर्णा सहकारी साखर कारखाना लि., वसमतनगरच्या सर्व सन्माननीय सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कळविण्यात येते की, ज्या सन्मा.सभासद, ऊस उत्पादक शेतकरी यांनी आपला ऊस गळीत हंगाम 2023-24 मध्ये पूर्णा कारखान्यास गाळपास दिला आहे, अशा सभासदांचा ऊस बिलाचा तिसरा हप्ता रुपये 250 प्रति मेट्रिक टन याप्रमाणे त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेला आहे तरी सन्माननीय सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपले बँकेशी संपर्क करावा असे आवाहन कारखाना प्रशासनाने केले आहे. शेतकरी बांधवांनी वरील बातमी मुळे येणारे सण व उत्सव उत्साहाने साजरे केले जातील असे म्हणत आनंद व्यक्त केला आहे.