शिवानंद तोटकर यांची जिल्हा संघटक सचिव पदी निवड
शिवानंद तोटकर यांची जिल्हा संघटक सचिव पदी निवड
गुडसूर प्रतिनिधी : येथील शिवानंद दिगंबर तोटकर यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पक्षाकडून जिल्हा संघटक सचिव पदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक काचा वर्षाव होत आहे.
गुडसूर येथील रहिवासी असलेले शिवानंद दिगंबर तोटकर हे लहान वयातच राजकारणाविषयी आवड असणारे व्यक्तिमत्व आहे ते दोन वेळेस गावातील वि.वि. सोसायटीचे सदस्य म्हणून काम पाहिले तर पाच वर्ष उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून ही आपली कारकीर्द गाजवली नुकतीच त्यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून जिल्हा संघटक पदी निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष संजय शेठे यांच्याकडून देण्यात आले यावेळी बसवराज पाटील नागराळकर, माजी आमदार सुधाकर भालेराव, शिवाजीराव मुळे, चंदन भैया नागराळकर, माधव गंगापुरे, ज्ञानेश्वर पाटील, कृष्णा घोगरे उपस्थित होते या निवडीबद्दल मा. चेअरमन गणपतराव नवाडे माधव टेपाले, खलील मुंजेवार, उत्तम सूर्यवंशी बळीराम नवाडे सुखदेव गुमनर व सर्व गुडसूर ग्रामस्थांकडून अभिनंदन केले जात आहे.