शिवनामामुळे जीवनात परिवर्तन येते- स्वामी श्रीदर्शक हाथी

शिवनामामुळे जीवनात परिवर्तन येते- स्वामी श्रीदर्शक हाथी
भोकरमध्ये मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे भाविकांनी घेतले दर्शन
**********
भोकर( तालुका प्रतिनिधी) एक हजार वर्षांपूर्वी स्थापित झालेले शिवलिंग तोडून टाकण्यात आले होते त्या वेळच्या पुजाऱ्यांनी सांभाळून ठेवले होते ते ज्योतिर्लिंग पुनर्स्थापित करून पूर्ण देशात जाणार आहे शिवनामामुळे मानवी जीवनात परिवर्तन येते असे विचार आर्ट ऑफ लिव्हिंग बेंगलोरचे स्वामीजी श्रीदर्शक हाथी यांनी भोकर येथे बोलताना मांडले.
वैदिक धर्म संस्थान व दीआर्ट ऑफ लिव्हिंग भोकर यांच्या वतीने 16 एप्रिल रोजी मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा जय केदारनाथ कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आला होता प्रारंभी भजन दिंड्यांच्या गजरात आरती ओवाळून स्वामीजींचे स्वागत करण्यात आले मूळ ज्योतिर्लिंगाची पूजा करण्यात आली यावेळी बोलताना स्वामीजी श्रीदर्शक हाथी जी म्हणाले एक हजार वर्षांपूर्वीचे मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग मोहम्मद गझनी ने तोडून टाकले होते पुजार्यांनी ते सांभाळून ठेवले होते श्री श्री स्वामीजी रविशंकर जी यांच्या हस्ते हे ज्योतिर्लिंग येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात पुनरस्थापित होणार असून पूर्ण देशभर दर्शनासाठी हे मूळ ज्योतिर्लिंग जाणार आहे दक्षिणेमध्ये शंभर वर्षे हे ज्योतिर्लिंग ठेवण्यात आले होते कोल्हापूर येथून आम्ही निघालो असून सगळीकडे दर्शनासाठी जात आहोत शिवस्वरूप चोहीकडे आहे, शिवनामामुळे जीवनाला मुक्ती मिळते, जीवनात परिवर्तन येते असेही स्वामीजी म्हणाले भजन सत्संग कार्यक्रम झाला त्यानंतर आरती करण्यात आली यावेळी महंत प्रभाकर बाबा कपाटे, आर्ट ऑफ लिव्हिंग वरिष्ठ प्रशिक्षक राजेश्वर भुरे, अरुणा भुरे, गोविंद बाबा गौड, प्रा. व्यंकट माने, पत्रकार बी.आर पांचाळ, डॉ. विठ्ठल माने, सोपान तोटावाड, संतोष उत्तरवार, शिवानंद पाटील,आकाश गौड यांच्यासह साधक मंडळ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या