शालेय व्यवस्थापन समिती नागरजवळा अध्यक्षपदी श्री.राजेश कारभारी होगे तर उपाध्यक्षपदी सौ.मनिषा अमोल होगे यांची निवड
शालेय व्यवस्थापन समिती नागरजवळा अध्यक्षपदी श्री.राजेश कारभारी होगे तर उपाध्यक्षपदी सौ.मनिषा अमोल होगे यांची निवड
मानवत प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागरजवळा येथे शालेय व्यवस्थापन समिती पुनर्गठीत करण्यात आली. आज दिनांक 5 ऑक्टोबर 2024 शनिवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागरजवळा येथे शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठीत करण्यासाठी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शासनाच्या नियमानुसार शैक्षणिक वर्ष 2024-25 आणि शैक्षणिक वर्ष 2025 -26 साठी शालेय व्यवस्थापन समिती पुनर्गठीत करण्यासाठी पालक सभेचे आयोजन करण्यात आले. त्यात अनेक पालकांनी सहभाग घेतला. श्री.भागवत बापूराव जाधव,श्री. विजय आत्माराम होगे,श्री.शिवाजी बापूराव होगे, नवनाथ पंढरीनाथ होगे, सौ.शितल गणेश होगे, सौ.राधिका गोविंद होगे, सौ.कल्याणी महादेव जाधव, सौ.सावित्रा सुंदरराव होगे, श्रीमती अयोध्या गजानन होगे,सौ.अरूणा नारायण कसारे आणि सौ.राजवंती राकेश बारेला यांची पालक सदस्य म्हणून निवड करण्यात आली… तसेच श्री.संभाजी श्रीरंग होगे यांची (शिक्षणप्रेमी नागरिक), श्री.असाराम सोपानराव होगे (स्था.प्रा.ग्रा.पं.सदस्य) म्हणून निवड करण्यात आली….
या पालक सभेत श्री.गजानन होगे, श्री.बाबासाहेब होगे, भागवत होगे, सचिन होगे, ज्ञानेश्वर होगे, अर्जुन होगे, दत्तात्रय देंडगे, सुरेश देंडगे (पोलिस पाटील) यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते…श्री.गणेश नामदेवराव होगे यांनी नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सन्मानीय सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले… यावेळी श्री.माणिक आवचार सर,श्री.विकास जुकटे सर, श्रीमती राणी दसमले मॅडम, श्रीमती शोभा गिरी मॅडम आणि श्री.सोनय्या किर्तनकार सर यांनी नवनियुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सन्मानीय सदस्यांचे स्वागत आणि हार्दिक अभिनंदन केले.