विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीचे पालिका प्रशासनाला निवेदन
विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीचे पालिका प्रशासनाला निवेदन
मानवत प्रतिनिधी – शहरातील अनेक वस्त्यांमध्ये स्वच्छतेच्या प्रश्नासह विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा याप्रश्नी तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेला दिलेल्या निवेदनात गुरुवारी ता २५ देण्यात आला .
निवेदनात म्हटले आहे की , शहरातील मोंढा परीसर, आंबेडकर नगर, बौद्ध नगर सह इतर ठिकाणी नाल्या, झाड झूड करने, कचरा गाडी इतर कोणत्याही प्रकारची सुविधा बरेच दिवसापासून नाही. त्यामुळे दलित वस्ती परिसरात घाणिचे साम्राज्य पसरलेले आहे. वारंवार तोंडी सांगून सुद्धा स्वच्छता करण्यात येत नाही.
तसेच मानवत शहरात नळ प्लंबर हे मागच्या १५ वर्षांपासून न.पा.मानवत चे अधिकृत प्लंबर असून ते सतत काम करीत आहेत. परंतु मागील ९ महिन्यापासून सर्वच प्लंबर चे बिले थकीत आहेत . त्यामुळे सर्व प्लंबर आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. त्यांची बिल देण्याचे टाळून बाहेरील लोकांना ज्यांना पाणीपुरवठा काम करण्याचे अनुभव नाही अशा लोकांना कामाचे आदेश देत आहे. त्यामुळे मानवत शहरात भर पावसाळ्यात १० ते १२ दिवसापासून पाणीपुरवठा सुरळीत नाही.
तसेच जागोजागी नाल्यामध्ये पाईप फुटून नाली मधील घाण पाणी पाईपलाईन मध्ये जात आहे. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे .
जुम्मन प्लॉट येथे मागच्या वर्षभरापासून नळाला पाणी येत नाही त्यामुळे तेथील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे.
दलित वस्ती येथील स्वच्छता, नळ प्लंबर यांचे बिले व जुम्मन प्लॉट येथील पाणीपुरवठा या सर्व बाबी येणाऱ्या ८ दिवसात पूर्ण न झाल्यास महाविकास आघाडी च्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे .
निवेदनावर शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख अनिल जाधव, सिटू चे जिल्हा सचिव रामराजे महाडीक, आरपीआय च्या महिला जिल्हा आघाडीप्रमुख कांता गवळी, सेनेचे उपशहरप्रमुख शिवाजी सोरेकर, नंदू पाटील, अनिल दहे, गिरी महाराज, पांडुरंग जाधव, कुंडलीक थिटे, युनूस कुरेशी, नवनाथ गुद्दटवार, शेषेराव धूमाळ, गणेश गिराम, शंकर बागडे, विनायक बालकूंड, ओमकार निन्हाळ, परमेश्वर मुळूक, गजानन इंगोले, अशोक परड, योगेश दसरथे, बापूराव दसरथे, सुनिल कोटेवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .