विवाहित महिलेस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी दोन आरोपीस ०७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
विवाहित महिलेस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी दोन आरोपीस ०७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
उदगीरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
उदगीर प्रतिनिधी – विवाहित महिलेस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी दोन आरोपीस ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. डी. सुभेदार यांनी ठोठावली.
या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस स्टेशन देवणी जि. लातूर अंतर्गत असलेल्या एका गावातील पिडीत महिलेस तिच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेवून व तिच्या सोबत ओळख वाढवून या गुन्हयातील आरोपी सुजाता गिरी हिने जबरदस्तीने देवणी येथून पळवून नेले. व त्यानंतर आरोपी राजू घोडेकर याने पिडीतेस मोटार सायकलवर बसवून लातूर येथे कंपनीचे गोडावून मध्ये नेवून ठेवले व तेथे या गुन्हयातील फरार आरोपी गजानन घोडेकर याने सदर पिडीत महिलेवर बलात्कार केला. त्या संबंधीची लेखी तकार पिडीतेने देवणी पोलीस स्टेशनला दिली. त्या तकारीवरुन आरोपीविरुध्द कलम ३६३, ३६६, ३७६ (२) (एन) भादवि अन्वये गुन्हा नोंद करून गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक डी.डी. शिंदे यांनी केला व दोन्ही आरोपीविरुध्द दोषारोपपत्र पोलीस निरीक्षक कामटेवाड यांनी उदगीरच्या न्यायालयात दाखल केले.
उदगीर येथील अति. जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होवून व सरकार पक्षाच्या वतीने एकुण ०९ साक्षिदारांची साक्ष नोंदविण्यात आल्या. सरकार पक्षाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या साक्षिदारांच्या साक्षिपुराव्यांवर व कागदपत्रावरती तसेच सहा. सरकारी वकील शिवकुमार गिरवलकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.डी. सुभेदार यांनी राजू घोडेकर व सुजाता गिरी या दोन आरोपीस ०७ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी २हजार रु. दंड तसेच दंड न भरल्यास १ महिना सश्रम कारावासाची शिक्षा न्या. पी. डी. सुभेदार यांनी ठोठावली.
या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील म्हणून अॅड. शिवकुमार गिरवलकर यांनी काम पाहिले.