आपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताराजकारणशालेय शिक्षण व क्रीडासरकारी योजना
विभागीय शिक्षण मंडळाच्या अशासकीय सदस्यपदी प्रा अनंत गोलाईत यांची निवड
विभागीय शिक्षण मंडळाच्या अशासकीय सदस्यपदी प्रा अनंत गोलाईत यांची निवड
मानवत प्रतिनिधी : येथील स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व संस्थाचालक प्रा अनंत बाबुराव गोलाईत यांची छत्रपती संभाजीनगर च्या विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यकारी समितीच्या अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे .
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री यांचे शिफारशीनुसार शिक्षण मंडळाचे कार्यासन अधिकारी मृणाली काटेंगे यांनी छत्रपती संभाजीनगर विभागातून कार्यकारी समितीच्या रिक्त पदावर १७ अशासकीय सदस्यांची नियुक्ती मंगळवारी ता १५ केली असून यामध्ये प्रा अनंत गोलाईत यांची व्यवस्थापन समिती माध्यमिक विभागात सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे . प्रा गोलाईत यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले जात आहे .