आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताराजकारणसरकारी योजना

विधानसभा निवडणुकीची लढाई सुरू झाली आहे रणांगणात उतरायचंय- खा.अशोकराव चव्हाण

विधानसभा निवडणुकीची लढाई सुरू झाली आहे रणांगणात उतरायचंय- खा.अशोकराव चव्हाण
*****************
भोकर मध्ये खा.चव्हानांच्या हाकेला कार्यकर्त्यांनी दिली उस्फूर्त साथ
************

भोकर (प्रतिनिधी) भोकर विधानसभा मतदार संघात विकास कामांना कधी कमी पडू दिलं नाही या भागातील जनतेचं चव्हाण कुटुंबीयांवर फार मोठ प्रेम आहे विधानसभा निवडणुकीची लढाई सुरू झाली असून श्रीजया चव्हाण रणांगणात उतरणार आहे भाजपाचे सर्व युवा कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी गावागावात जाऊन ग्राम पातळीपासून बुथ कमिटी पर्यंत सर्वांनीच कामाला लागावे असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी भोकर येथील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना केले.
येणाऱ्या दोन महिन्यानंतर विधानसभा निवडणुका लागणार असून भोकर विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या युवा नेत्या श्रीजया चव्हाण यांनी संपर्क दौरा करून सर्व समाजातील लोकांचे आशीर्वाद घेतले आहेत सर्वांनी चांगला प्रतिसाद दिल्याने त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली असून त्याअनुषंगाने भोकर येथील गणराज रिसॉर्ट मंगल कार्यालयात दि .31 ऑगस्ट रोजी भोकर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण म्हणाले गेली आठ वर्षापासून भोकर तालुक्याच्या विकास कामांच्या सतत पाठीमागे असून नुकतेच पिंपळढव तलावाचे भूमिपूजन झाले सुधा प्रकल्पांची उंची वाढवणे या कामासाठी मंजुरी मिळून निधी प्राप्त झाला इतर अनेक कामे सुद्धा मार्गी लागली असून 927 कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले आहे संत सेवालाल महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे ग्रामीण भागातील माणसं कधीच नाराज दिसली नाही पाहिजे त्यांच्या चेहऱ्यावर आनंदी हसू दिसल पाहिजे ही माझी इच्छा आहे कामापुरता वापर मी कधीच करीत नाही सगळ्यांची कामे न विसरता मी करतो आता येणाऱ्या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी सज्ज राहिले पाहिजे दुप्पटीने काम करावे लागेल मी नेता म्हणून बोलत नाही तर आपण एकमेका सोबत आत्मीयतेने आहोत आपण किती चिकाटीने काम करता हे महत्त्वाचं आहे एकमेकांना खाली खेचण्याचा प्रयत्न कोणी करू नका आता येणाऱ्या निवडणुकीसाठी मत खायला अनेक जण उभे राहतील पाडापाडी करण्याचा कार्यक्रम करतील अशा लोकांना मात्र ओळखून राहा कुणाच्या नादी लागू नका तुमचे स्वप्न पूर्तता करण्यासाठी आम्ही तयार आहोत आता गावागावात प्रत्येक बुथवर अधिक मतदान व्हावे लागेल मतदान कमी होता कामा नये गावातील प्रत्येक समाजाशी संपर्क ठेवून सर्वांच्या भेटी घेण्याचे काम युवकांनी करावं नवीन मतदारांसाठी सुद्धा आपणास वेळ द्यावा लागेल त्यांच्याशी बोलावे लागेल सोशल मीडियाने सुद्धा सतर्क राहून विरोधकांना उत्तरे द्यावे लागतील बूथ प्रमुखांचे ट्रेनिंग घेऊन त्यांना सर्व माहिती देण्यात येईल लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलण्याबाबत विरोधकांनी अपप्रचार केला ग्रामीण भागातील लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण केली म्हणून अपयश आलं आता असे होता कामा नये महायुती सरकारच्या सर्व योजनांची माहिती लोकांपर्यंत न्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासंदर्भात लाभार्थी राहिले असतील त्यांची माहिती घ्या सर्वांना लाभ मिळवून द्या कामगारांचे प्रश्न महिला बचत गटांचे प्रश्न या संदर्भातही आढावा घेण्यात येईल जिवाभावाने काम करणारे लोक हवे आहेत भोकर विधानसभा मतदारसंघात आणखी निधी आणण्यासाठी माझा प्रयत्न चालूच राहणार आहे या मतदारसंघात आपल्यासाठी वातावरण चांगले असून नक्कीच विजय मिळू शकतो असा आशावादही खा.चव्हाण यांनी शेवटी व्यक्त केला

जल जीवन मिशनच्या अर्धवट कामांची चौकशी करणार
*****************

भोकर मुदखेड अर्धापूर या तीनही तालुक्यांमध्ये जलजीवन मिशनच्या कामांना सुरुवात झाली कामे अर्धवट स्थितीत आहेत काही गुत्तेदार निकृष्ट दर्जाची कामे केल्याच्या तक्रारी आहेत अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत पाणीपुरवठा योजना सुरू झाली नाही ह्या सर्व कामाबाबत आपण चौकशी करणार असून केंद्र सरकारच्या लोक लेखा समितीवर मी आहे या अर्धवट राहिलेल्या कामाबाबत मी चौकशी लावणार आहे असेही खा.अशोकराव चव्हाण बोलताना म्हणाले.

मी ताकद दाखवत नाही दाखवली तर साफच करतो
******************

विकास कामांसाठी मी कधीच कमी पडणार नाही निधी खेचून आणण्यासाठी सुद्धा मी समर्थ आहे मी माझी ताकद कधी दाखवत नाही मात्र ताकद दाखवली तर मात्र साफच करतो असेही यावेळी खा.चव्हाण आपल्या भाषणात बोलताना म्हणाले

भोकर माझा परिवार आहे मी तुमची लाडकी बहीण आहे
*****************

भोकर विधानसभा मतदार संघात खा.अशोकराव चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली, विकासासाठी मोठी ताकद लावली त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून तुमच्या सर्वांची सेवा करण्यासाठी मी तयार आहे मला तुमची लाडकी बहीण समजा मला सर्वांनी आशीर्वाद द्या मी मेहनत घ्यायला तयार आहे सेवा ही करायला तयार आहे असे भावनिक मत युवा नेत्या श्रीजया चव्हाण यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविक भाजपाचे मंडळ समन्वयक भगवानराव दंडवे यांनी केले, माजी आमदार अमर राजूरकर यांनीही यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या जोमाने कामाला लागावे असे आवाहन केले, या बैठकीसाठी किशोर पा.लगळूदकर,जगदीश पा.भोसीकर, सौ मंगाराणी अंबुलगेकर,बाळा साकळकर गणपत पिटेवाड,विनोद पाटील चिंचाळकर,संतोष मारकवार,साहेबराव सोमेवाड,बाबुराव गोपतवाड,मारुती बल्लाळकर,अतरिक पाटील मुंगल, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष, मारोतराव भोंबे, विशाल माने,वेणू कोंडलवार, सुनील शाह ,कल्पनाताई भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन रामचंद्र मुसळे यांनी केले तर आभार भाजपा तालुका अध्यक्ष गणेश पाटील कापसे यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button