सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताशालेय शिक्षण व क्रीडा

विद्यार्थ्यांना मिळाली शाबासकीची थाप

विद्यार्थ्यांना मिळाली शाबासकीची थाप

अहमदपुर प्रतिनिधी : अहमदपूर येथील नूतन मराठी प्राथमिक शाळेने एम. टी. एस.ऑलिम्पियाड राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत सहभाग नोंदवला होता त्यातील काही विद्यार्थी गुणवत्ता धारक बनले. सोमेश्वर रकटे, विवेक भोपळे, ख़ुशी गायकवाड, वल्लभ तावडे, नदीम कासार यांनी सुवर्ण पदक पटकावले. तसेच रागिनी चेरले, स्वप्नाली देवकते, गौसिया कासार, बालाजी आंबेकर, वरद शेटकर यांनी रोप्य पदक पटकावले. या विद्यार्थ्यांना श्रीमती बेंबळे मॅडम, श्रीमती बिरादार मॅडम, श्रीमती देशमुख मॅडम व श्री उप्परवाड सर यांनी मार्गदर्शन केले. या विद्यार्थ्यांना लोकयात चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष मा. श्री. आबासाहेबजी देशमुख व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गायकवाड मॅडम यांनी पुष्पहार घालून सत्कार केला. तसेच प्रमुख पाहुणे श्री. तावडे सर व शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसंबंधी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बेंबळे मॅडम यांनी केले. तर आभार उप्परवाड सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक श्री कोतलापुरे सर, श्री पुठठेवाड सर, कुलकर्णी मॅडम, श्रीमती पोलावर मॅडम यांनी परिश्रम घेतले.संस्थेचे सचिव मा. श्री. अक्षयभैय्या देशमुख यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button