वासवी भवन मंगल कार्यालयाच्या सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन संपन्न
वासवी भवन मंगल कार्यालयाच्या सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन संपन्न…
वसमत.प्रतिनिधी : दिनांक 13 सप्टेंबर रोज शुक्रवारी वसमत शहरातील आर्य वैश्य समाज बांधवांच्या वासवी भवन, आर्य वैश्य मंगल कार्यालय येथे सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन आमदार श्री राजु भैय्या नवघरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या सभामंडप बांधकामासाठी वसमतचे आमदार श्री राजु भैय्या नवघरे यांनी शहर विकास निधीतून 30 लक्ष रुपये शासकीय निधी उपलब्ध करून दिला आहे.
आर्य वैश्य समाजाची मागणी विचारात घेऊन व समाजोपयोगी कार्यासाठी हा निधी उपलब्ध करून दिला असुन त्याचा समाज बांधवांनी योग्य विनियोग करावा असे प्रतिपादन यावेळी प्रमुख पाहुणे आमदार श्री राजु भैय्या नवघरे यांनी केले.
याच कार्यक्रमात नुकतेच असिस्टंट कंट्रोलर, (वजन मापे कार्यालय) अमरावती येथुन सेवानिवृत्त झालेले श्री संतोष सुरेश दलाल यांचा आर्य वैश्य समाज बांधवां तर्फे आमदार श्री राजु भैय्या नवघरे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदारांनी केलेल्या सहकार्याबद्दल समाज आपला ऋणी आहे तसेच भविष्यातही सामाजिक कार्यासाठी आपण पाठबळ द्यावे अशी अपेक्षा आर्य वैश्य समाज अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत कोसलगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली व उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी श्री बालु मामा ढोरे, श्री जीजाराव हरणे, सभापती श्री तानाजीराव बेंडे, श्री त्र्यंबक कदम, श्री सचिन दगडु यांच्या सह डॉ किशोर गुंडेवार, श्री श्यामसेठ डिगुळकर, श्री सुनिल मुगुटकर, श्री विठ्ठल कोटगीरे, आर्य वैश्य समाज कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी व आर्य वैश्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.