वाकद येथील पाझर तलाव सांडव्याच्या भिंतीला छिद्र पाडून पाणी बाहेर काढले; तहसीलदार घोळवे यांचे यशस्वी प्रयत्न
वाकद येथील पाझर तलाव सांडव्याच्या भिंतीला छिद्र पाडून पाणी बाहेर काढले; तहसीलदार घोळवे यांचे यशस्वी प्रयत्न
****************
भोकर (बी.आर.पांचाळ) तालुक्यात गेली 3 दिवसापासून संततधार अतिवृष्टीने पाऊस चालू असल्यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आले आहेत,तलावा मध्ये देखील पाणी मोठ्या प्रमाणावर साठले आहे तालुक्यातील वाकद येथील पाझर तलावाला सायळी या प्राण्याने अनेक ठिकाणी छिद्र केले होते त्यामुळे तलावाला धोका निर्माण होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन तहसीलदार सुरेश घोळवे यांनी तात्काळ वाकद येथील तलावात जेसीबी लावून सांडव्याच्या भिंतीला छिद्र पाडून अधिक पाणीसाठा बाहेर काढल्याने धोका टळला आहे.
भोकर तालुक्यात गेली तीन दिवसापासून संततधार पाऊस असल्याने अनेक तलावातलावात पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर झाला आहे अनेक नद्यांना पूर आले आहेत, काही गावांचे रस्ते देखील पुराने वेढले होते, तालुक्यातील वाकड येथील बाजार तलावाला सायली या प्राण्याने अनेक ठिकाणी छिद्र पाडले होते ही बाब तहसीलदार सुरेश घोळवे यांच्या निदर्शनास यापूर्वीच आली होती पावसाळ्यात तलावातील पाणीसाठा वाढल्यामुळे या गंभीर प्रकाराचि दखल घेऊन त्यांनी3 सप्टेंबर रोजी जेसीबी लावून तलावाच्या सांडव्याच्या भिंतीला छिद्र पाडून तलावात अधिक झालेला पाणीसाठा त्या मार्गाने बाहेर काढला यामुळे तलावाला होणारा धोका टळला आहे मंडळ अधिकारी तलाठी सरपंच व गावातील मंडळींनी या कामी सहकार्य केले