सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रक्राईम वार्ता

वसमत शहरात पुन्हा सोनसाखळी चोर सक्रिय; महिलांमध्ये भीतीचे वातावरण

वसमत शहरात पुन्हा सोनसाखळी चोर सक्रिय; महिलांमध्ये भीतीचे वातावरण

वसमत, 30 मार्च 2025: वसमत शहरात पुन्हा एकदा सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या असून, चोरट्यांनी सकाळच्या वेळी एक मोठा प्रकार केला आहे.

आज रविवार 30 मार्च रोजी, वसमत शहरातील तांभाळे हॉस्पिटलच्या बाजूस, बालाजीनगर भागातील सौ. पुष्पाताई अवचार आपल्या घरासमोर झाडत असतांना सकाळी 7 वाजता मोटरसायकलवर आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांची गळ्यातील मंगळसूत्र व चैन ओढली.

सौ. अवचार ताईंनी चोरट्यांचा प्रतिकार केला आणि आरडा ओरड केली. त्यांच्या आवाजाने आजुबाजूला असलेल्या नागरिकांना याची चाहुल लागली, आणि ते धावत आले. मात्र, चोरट्यांना हे लक्षात येताच ते मोटरसायकलवरून पसार होण्यात यशस्वी झाले.

हे सर्व वर्दळीच्या ठिकाणी घडल्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, या सोनसाखळी चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे, ज्यामुळे पोलिसांना तपास करण्यात मदत होईल. यापूर्वीही शहरात अशा घटनांची पुनरावृत्ती झाली आहे. चोरट्यांनी बर्याच काळानंतर पुन्हा एकदा संधी साधण्याचा प्रयत्न केला आहे.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

सोनसाखळी चोरीच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि पोलिसांनी अधिक कडक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button