सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रधार्मिक वार्तासामाजिक कार्य

लोह्यात भक्तिरसाचा महासोहळा – हभप गुरूवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांचे हरि किर्तन

लोह्यात भक्तिरसाचा महासोहळा – हभप गुरूवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांचे हरि किर्तन

लोहा (प्रतिनिधी) – लोहा शहरात भक्ती, ज्ञान आणि परमार्थाचा संगम घडवणारा एक अनोखा सोहळा संपन्न होणार आहे. लक्ष्मीराज सुपरमार्केट, स्टेट बँकेच्या पाठीमागे असलेल्या माऊली निवास या नवीन वास्तूच्या गृहप्रवेश सोहळ्यानिमित्त प्रतिष्ठित कीर्तनकार हभप गुरूवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या पवित्र हरि किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

३ एप्रिल २०२५ (गुरूवार), चैत्र कृ. ६, शके १९४७ रोजी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत हा भक्तिरसाने न्हालेला किर्तनाचा महोत्सव संपन्न होईल. या पावन सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व भाविकांनी या पवित्र प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक लक्ष्मीकांत नरसिंह बच्चेवार यांनी केले आहे.

हे किर्तन फक्त प्रवचन नसून, ते आत्मशुद्धी व ईश्वरी भक्तीचा महासागर असेल. संतवाणी, हरिपाठ आणि ओवींच्या माध्यमातून जीवनमूल्यांचा संदेश देणारे हे किर्तन भक्तगणांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे सर्व भाविक भक्तांनी या अद्वितीय भक्तिसोहळ्यास उपस्थित राहून आध्यात्मिक आनंदाचा लाभ घ्यावा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button