सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
आपला महाराष्ट्रसामाजिक कार्य

लोह्यातून कोटगिरे व कोंडावार यांची महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या जिल्हा कार्यकारिणी साठी शिफारस

लोह्यातून कोटगिरे व कोंडावार यांची महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या जिल्हा कार्यकारिणी साठी शिफारस

लोहा, (प्रतिनिधी)
लोहा शहरातील सामाजिक आणि सामुदायिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या सूर्यकांत व्यंकटराव कोटगीरे आणि नितीन वसंतराव कोंडावार यांची महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या नांदेड जिल्हा कार्यकारिणी (ग्रामीण) साठी शिफारस करण्यात आली आहे.

ही शिफारस लोहा येथील आर्य वैश्य नगरेश्वर मंदिर समितीच्या सभेमध्ये विचारविनिमय करून करण्यात आली. समितीचे अध्यक्ष दिनेश तेललवार यांनी ही माहिती देताना सांगितले की, कोटगीरे आणि कोंडावार हे दोघेही समाजसेवेच्या कार्यात अग्रेसर असून, त्यांच्या नेतृत्वाखाली आर्य वैश्य समाजाच्या प्रगतीस चालना मिळेल.

या शिफारशीमुळे लोहा शहराचा सन्मान वाढला असून, समाजबांधवांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. या निवडीमुळे समाजाच्या हितासाठी नवे उपक्रम आणि योजनांची अंमलबजावणी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button