आपल्यला लोन पाहिजे का ?
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्तासरकारी योजना

लोहा पंचायत समितीला आयएसओ मानांकन

लोहा पंचायत समितीला आयएसओ (ISO) मानांकन

लोहा १४- लोहा पंचायत समितीला मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. यापूर्वी नांदेड पंचायत समितीला आयएसओ मानांकन मिळाले होते.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी पंचायत समितीला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. इतर पंचायत समितीने देखील प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी आयएसओ मानांकन प्रमाणपत्र गटविकास अधिकारी यांना प्रदान करण्यात आले.
लोहा पंचायत समितीने केंद्र तसेच राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपक्रमात प्रभावी अंमलबजावणी, परिणामकारक पर्यवेक्षण, लाभार्थ्यांना तत्पर सेवा, झिरो पेंडन्सी अशा विविध बाबीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सामान्य प्रशासन, शिक्षण, पंचायत, कृषी व पशुसंवर्धन, आरोग्य, महिला व बालविकास, रोजगार, स्वच्छता व पाणी पुरवठा आदी विभागामध्ये केलेल्या प्रभावी कामगिरीची दखल या मानांकनावेळी घेण्यात आली. कामाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन यासह दस्तऐवजांचे वर्गीकरण अशा सर्व बाबींच्या माध्यमातून लोहा पंचायत समितीने मानांकन मिळविले आहे. अशा प्रकारचा बहुमान मिळविणारी जिल्ह्यातील दुसरी पंचायत समिती लोहा ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button