सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताशेती विषयीसरकारी योजना

लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ‘एआय महाविस्तार’ ॲपचा वापर करावा : तालुका कृषी अधिकारी प्रशांत काशराळे

लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ‘एआय महाविस्तार’ ॲपचा वापर करावा : तालुका कृषी अधिकारी प्रशांत काशराळे

लोहा | प्रतिनिधी : आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती अधिक उत्पादनक्षम व शाश्वत करण्यासाठी लोहा तालुक्यातील सर्व मोबाईलधारक शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आलेले ‘एआय महाविस्तार’ ॲप डाउनलोड करून वापरावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रशांत काशराळे यांनी केले आहे.या एआय आधारित महाविस्तार ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीस उपयुक्त विविध तंत्रज्ञानाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. पिकांवर येणाऱ्या रोग व किडींचे नियंत्रण, खत व्यवस्थापन, पेरणीपासून काढणीपर्यंतचे मार्गदर्शन, पिक लागवड तंत्र तसेच हवामानाचा अचूक अंदाज या सर्व बाबींची माहिती शेतकऱ्यांना या ॲपद्वारे मिळणार आहे. महाविस्तार ॲपचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे चॅटबॉट सुविधा, ज्याद्वारे शेतकरी आपल्या मातृभाषेत प्रश्न विचारू शकतात आणि तज्ज्ञांकडून तत्काळ मार्गदर्शन मिळवू शकतात. यासोबतच बाजारभाव, जवळील धान्य साठवण गोदामांची माहिती तसेच शेतीविषयक योजनांची अद्ययावत माहितीही या ॲपमध्ये उपलब्ध आहे. महाडिबीटी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अंतर्गत शेती अवजारे, तुषार सिंचन, ठिबक सिंचन तसेच इतर शेतीविषयक साहित्य ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवरूनच अर्ज करून घेण्याची सुविधा या ॲपमधून मिळणार असल्याने शेतकऱ्यांचा वेळ व खर्च दोन्ही वाचणार आहेत.‘एआय महाविस्तार’ ॲप हे राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेले एक उपयुक्त डिजिटल साधन असून, त्याचा लाभ लोहा तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याने घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रशांत काशराळे यांच्यासह सर्व मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी व सहायक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button