लोहा – कंधार ची जनता येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेची मशाल पेटविणार – एकनाथ दादा पवार
लोहा -कंधार ची जनता येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेची मशाल पेटविणार – एकनाथ दादा पवार
लोहा : सुरेश दमकोंडवार
खोटारड्या राजकारण्याला लोहा -कंधार ची जनता १०० टक्के घरी बसविणार व येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेची मशाल पेटविणार असे प्रतिपादन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक एकनाथ दादा पवार यांनी लोहा येथील त्यांच्या निवडणूक कार्यालयात भरगच्च पत्रकार परिषदेत केले.
दि. ३० सप्टेंबर रोजी शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक एकनाथ दादा पवार यांचा लोहा -कंधार मतदार संघात झंझावात दौरा झाल्यानंतर त्यांची लोहा येथील त्यांच्या निवडणूक कार्यालयात भरगच्च पत्रकार झाली.
यावेळी शिवसेनेचे नांदेड जिल्हा सहसंपर्कप्रमुख अॅड मुक्तेश्वर धोंडगे, लोहा -कंधार विधानसभा प्रमुख भाऊसाहेब पाटील कदम, दत्ता भाऊ शेंबाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी भैय्या परदेशी,तालुकाप्रमुख संजय ढाले, लोहा -कंधार विधानसभा समन्वयक सुरेश पाटील हिलाल, सुप्रसिद्ध निवेदक विक्रम कदम सर,शहरप्रमुख खंडू पाटील पवार,युवा सेनेचे जिल्हा समन्वयक योगेश पाटील नंदनवनकर, युवा सेनेचे लोहा तालुका अधिकारी गजानन मोरे, रूद्रा पाटील भोस्कर, कंधार तालुकाप्रमुख सचिन पेटकर, गजानन कराडे,आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना एकनाथ दादा पवार यांनी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा खरपूस समाचार घेतला. राजकारण हे माझी उपजीविका नाही जसे येथील दाजी – भावजीची आहे.
भाजपा पक्ष हा आता अस्ताला जात आहे. जो माणूस बहिणीचा होऊ शकत नाही तर इतरांचे काय. आता पर्यंत लोहा -कंधार मध्ये उद्घाटने झाली त्या कामांचे काय ती कामे झाली आहे का ? आता निघालेत निवडणूकीच्या पुढे उद्घाटन करायला.
सरकार हे मराठा आरक्षण, धनगर आरक्षण या सर्व आरक्षणाबदल फेल (नापास) झाले आहे. आता जनता हे सरकार बदलणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्याची तुमची लायकी आहे का.आता ४० आमदार हे गद्दार झालेत त्यांच्या अगोदर तुम्ही गदार झालात असे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर प्रहार केला.
तसेच मी थोडा आजारी असल्यामुळे अफवा केली की हे पुण्याला गेले निघुन मी पळणारा कार्यकर्ता नाही तर लढणारा कार्यकर्ता आहे.
मी येथील जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारा आहे, येथील विकासासाठी,गाव वाडी तांड्यावरील रस्त्याच्या विकासासाठी लढणारा आहे.
मी यांच्यासारखा माळेगांव यात्रेतील तमाशातील सोंगाड्या नाही . त्या दोघांना जो पैशाचा घमंड आला आहे ते येथील जनता उतरवील
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या सभेला माझ्या येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी जमवून रेकार्ड ब्रेक सभा करुन विरोधकांची बोलती बंद केली.
दि. २२ सप्टेंबर रोजी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत लोहा -कंधार शिवसेनेची बैठक झाली व त्यांनी सांगितले लोहा -कंधार ची जागा ही शिवसेनेची आहे व मी शिवसेना उबाठा व महाविकास आघाडीच्या वतीने १०० टक्के निवडणूक लढविणार आहे व येथील जनता ही शिवसेनेची मशाल पेटविणार आहे. विरोधात जर हिम्मत असेल तर त्यांनी चर्चा करायला कंधारच्या महाराणा प्रताप चौकात यावे.