लाडक्या बहिणीचे पैसे आले मात्र केवायसी मुळे बँकेत अडकले: भोकर मध्ये महिलांची बँकेत गर्दीच गर्दी
लाडक्या बहिणीचे पैसे आले मात्र केवायसी मुळे बँकेत अडकले: भोकर मध्ये महिलांची बँकेत गर्दीच गर्दी
***************
भोकर (तालुका प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली 14 ऑगस्ट रोजी काही महिलांच्या खात्यावर पैसे देखील पडले मात्र ज्यांचे पासबुक आधार कार्डशी जोडलेले नाही किंवा केवायसी केली नाही अशा महिलांना मात्र पैसे काढता येत नाहीत त्यासाठी केवायसी करून घेणे आवश्यक आहे या कामासाठी भोकर मधील एसबीआय बँक व इतर बँकांमध्ये सुद्धा मोठी गर्दी झालेली आहे.
महायुती सरकारने राज्यातील 21 ते 65 अवयव गटातील महिलांसाठी दर महिना 1500 रुपये देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली अधिकाधिक महिलांना लाभ मिळावा म्हणून त्यामधील काही अटी ही शिथिल केल्या अर्ज भरण्याची तारीख सुद्धा वाढवली काही कागदपत्र कमी केले त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज केले पात्र अर्ज धारकांना 14 ऑगस्ट 2024 रोजी शासनाने दोन महिन्याचे 3हजार रुपये प्रत्येक महिलांच्या खात्यावर टाकले आहेत त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.
केवायसी नसलेल्या लाडक्या बहिणीचे पैसे बँकेत अडकले
**************
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मात्र ठरलेल्या महिलांचे बँकेतील खाते आधारशी जोडणे आवश्यक आहे खात्याची केवायसी करून घेणे सुद्धा आवश्यक आहे, शासनाने मंजूर केलेले 3 हजार रुपये बँकेमध्ये जमा झालेले आहेत मात्र आधार खात्याशी लिंक नसल्यामुळे किंवा केवायसी केले नसल्यामुळे अनेक महिलांना पैसे उचलता येत नाहीत, बँकेमध्ये आधार लिंक करण्यासाठी केवायसी करण्यासाठी एसबीआय बँक भोकर शाखेमध्ये महिलांची मोठी गर्दी झालेली आहे केवायसी करण्यासाठी महिलांना तीन ते चार दिवस बँकेचे कर्मचारी फिरवत आहेत हे कागदपत्र पाहिजे ते कागदपत्र पाहिजे म्हणून ग्रामीण भागातील महिलांची कुचुंबना केली जात आहे अशिक्षित महिलांना काही समजत नसल्यामुळे बँकेमध्ये मात्र महिला रोज फिरून हैरान होत आहेत पैसे बँकेमध्ये अडकल्याने मोठ्या प्रमाणावर बँकेमध्ये महिलांची गर्दी झालेली आहे, कागदपत्र काढण्यासाठी सुद्धा महिलांना विनाकारण फिरावे लागत आहे.
भोकर तालुक्यातून, 32627 अर्ज झाले प्राप्त
****************
भोकर तालुक्यातून नारीशक्ती दूध ॲपवर 21 हजार 828 अर्ज प्राप्त झाले त्यापैकी 21 हजार 474 अर्जांना मंजुरी देण्यात आली पोर्टलवर 10 हजार 799 अर्ज प्राप्त झाले त्यापैकी 1693 अर्जांना मंजुरी देण्यात आली एकूण 32 हजार 627 अर्ज आतापर्यंत तालुक्यातून प्राप्त झाले असून मंजुरी देण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती ए.बा.वि. से.यो. प्रकल्प अधिकारी चटलावार यांनी दिली.