लड्डा विद्यालयाचा पहिल्याच वर्षी १००% निकाल
लड्डा विद्यालयाचा पहिल्याच वर्षी १००% निकाल
श्रेया कळसकर दोन तालुक्यातून गणित विषयात प्रथम
मानवत सौ ममता चिद्रवार – पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सौ.रामकंवर द्वारकादास लड्डा स्वयंअर्थ सहाय्यित विद्यालयाच्या दहावीच्या पहिल्या बॅचचा निकाल १०० % लागला आहे. विद्यालयाची विद्यार्थिनी श्रेया प्रदीप कळसकर हिने गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून मानवत व पाथरी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावी परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून मानवत येथील सौ.रामकंवर द्वारकादास लड्डा स्वयंअर्थ सहाय्यित विद्यालयाच्या दहावीच्या पहिल्या बॅचचा निकाल १०० % लागला आहे. एकूण २७ पैकी २३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर ३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. १० विद्यार्थ्यांनी ९० % पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. सर्वप्रथम ख़ुशी शैलेश काबरा ९६.६० %, द्वितीय श्रेया प्रदीप कळसकर, तृतीय ओम सचिन कोक्कर ९५.२० %.
बुधवार. दि. २९ रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार कत्रुवार हे होते तर व्यासपीठावर संचालक विजयकुमार दलाल, दिलीपराव हिबारे यांची उपस्थिती होती. यावेळी शैलेश काबरा, अनिल जाधव यांनी पालकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. विजयकुमार दलाल, दिलीपराव हिबारे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.बी.सावंत यांनी तर आभार पर्यवेक्षक व्ही. एल.शिंदे यांनी मानले.