राष्ट्रीय सेवा योजना शिबिराची यशस्वी सांगता
राष्ट्रीय सेवा योजना शिबिराची यशस्वी सांगता
वसमत…….. प्रतिनिधी…..
दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी मौजे जवळा खंदारबन येथे आयोजित बहिर्जी स्मारक महाविद्यालयाच्या विशेष शिबिराची सांगता झाली.या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष हु.बहिर्जी शिक्षण संस्थेची संचालक अँड रामचंद्रजी बागल साहेब हे होते तर प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मा.जाधव,उप प्राचार्य एन.एम.भोईवार,गावचे सरपंच अर्पिता पडोळे,उप सरपंच विलास जाधव, संस्थेचे संचालक अनिल नादरे सर,जि.प.प्रा.शाळा जवळ्याचे सहाशिक्षक श्री.अंभोरे सर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.बी.डी.शिंदे सरांनी केले त्या प्रास्ताविकात त्यांनी या सात दिवसीय विशेष शिबिरात घेतलेल्या कार्यक्रमाचा आढावा घेतला त्यानंतर काही स्वयंसेवकांनी, गावकऱ्यांनी,व जिल्हा परिषद शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मा.जाधव सरांनी कार्यक्रमाधिकारी, सहाय्य कार्यक्रमाधिकारी,
गावकरी व स्वयंसेवकाच्या अथक प्रयत्नातून हे शिबिर यशस्वी झाल्याचे सांगितले शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड रामचंद्रजी बागल साहेबांनी स्वयंसेवकांना अशा शिबिराची अत्यंत आवश्यकता आहे.कारण असा शिबिरातूनच विद्यार्थ्यांना एक दिशा मिळवून ते जीवनात यशस्वीतेचा मार्ग शोधतात यातूनच त्यांना ध्येयाकडे जाण्याचा मार्ग मिळतो. असा शिबिरातून यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन त्यांना प्राप्त होते. तसेच अशा शिबिरांचा गावकऱ्यांना सुद्धा खूप फायदा होत असतो.कारण या शिबिरातून गावकऱ्याविषयी अनेक उपक्रम राबवली जातात त्या उपक्रमाचा व मार्गदर्शनाचा गावकऱ्यांना फायदा होतो तेव्हा अशा शिबिराचे आयोजन हे आवश्यक वाटते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थिनी प्रतिनिधी प्रणाली कांबळे हिने केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा.राम कदम सरांनी केले.व हे शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी श्रीकांत गावंडे सर, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी श्रीमती पाटील मॅडम,डॉ.शिंदे मॅडम,कदम मॅडम, कोसकेवार मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले.