राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दर्शन पाटील डुरे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दर्शन पाटील डुरे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
भोकर( प्रतिनिधी) अजितदादा पवार यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री करण्यासाठी भोकर तालुक्यातील युवकांनी कंबर कसली असून राष्ट्रवादी पक्ष व अजितदादा पवार यांचे विचार युवकापर्यंत पोहचविण्यासाठी व युवकांना त्यांच्या आणि अडचणी मांडण्यासाठी त्यांचे हक्काचे ठिकाण असावे यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भोकर तालुका अध्यक्ष दर्शन पाटील डुरे यांनी युवक काँग्रेसच्या संपर्क करण्याची निर्मिती केली असून या संपर्कालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुरज भाऊ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले
दिनांक सात ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला संवाद मिळावा व युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यानंतर भोकरच्या उमरी रोड स्थित युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दर्शन पाटील डुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उत्तरचे जिल्हाध्यक्ष इंजि विश्वाभंर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क करण्याची उभारणी केली होती या संपर्क कराचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज दादा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उत्तरचे जिल्हाध्यक्ष इंजि विश्वाभंर पवार, बालाजी पाटील गौड अहमदभाई करखेलीकर कन्हैया पाटील, आनंद पाटील शिंदीकर, प्रतिक कदम,पूजा ताई व्यवहारे रवी भाऊ गेंटेवांर माधव पाटील व्यवहारे, सचिन सुंकळकर.
सम्यक सोनुले ,पवन पवार,सुनील कोंगेवाड ,लक्ष्मण डुरे, सचिन डुरे, भगवान तळेगावकर, रामू डुरे, पाशा शेख,विजय गोरटकर, ओम पांचाळ, रावसाहेब पारवेकर, गोविंद पावडे, गोविंद डुरे, ज्ञानेश्वर पाटील, सह आदींची उपस्थिती होती