राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट बनवला सक्षम
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट बनवला सक्षम
————–
इंजि.विश्वंभर पवार यांचा भोकर विधानसभा मतदारसंघात झंजावात; सामाजिक उपक्रमातून जनहिताची कामे सुरू
****************
भोकर( तालुका प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्थापन होताच जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन व विकास समितीचे सदस्य इंजिनीयर विश्वंभर पवार यांनी जन विकासाची कामे हाती घेऊन ती मार्गी लावली,मागण्यांचा पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून घेतला, भोकर विधानसभा मतदारसंघात त्यांनी झंझावात दौरा सुरू करून गावागावात जनसामान्यांच्या भेटी घेऊन त्यांना मदतीचा हात दिला,विविध सामाजिक उपक्रम राबवून लोकांच्या सेवेची कामे सुरू केली,सर्व समाजातील युवकांना सोबत घेऊन वाटचाल चालू असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गट सक्षम बनला आहे.
लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर विधानसभेचे वारे वाहू लागले आहे आपण समाजकार्यात कुठे कमी नाही,जनता संपर्कात कुठे कमी नाही,विकास कामांमध्ये कुठे कमी नाही ही भावना मनात धरून इंजि.विश्वंभर पवार यांनी युवकांची फळी जमवून त्यांना विविध पदावर संधी दिली त्या माध्यमातून पक्षाचे बळकटीकरण झाले,केवळ गप्पाच न करता प्रत्यक्षात कृती करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला, भोकर विधानसभा मतदारसंघात जनसंपर्क वाढवून गावागावात जाऊन जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत असो,गरीब कुटुंबाला आर्थिक मदत असो,मोफत आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे घेऊन सर्वसामान्य माणसाला आरोग्याचा आधार देणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, वृक्षारोपण अशी कामे त्यांनी हाती घेतली आहेत.
केवळ बोलून चालत नाही तर प्रत्यक्षात कामे करण्यासाठी निधी हवा असतो ही जाण ठेवून इंजि.विश्वंभर पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांचा मंत्रालयापर्यंत पाठपुरावा चालूच असतो, डॉ .शंकरराव चव्हाण रुग्णालय नांदेड येथे सुशोभीकरणासाठी 20 कोटी रुपये त्यांनी मंजूर करून घेतले, जिल्हा नियोजन व विकास समिती कडे त्यांनी 200 कोटी रुपये विकास निधीची मागणी केली,सत्ताधारी मंडळींनी सुद्धा कधी एवढा विकास कामासाठी ध्यास घेतला नाही त्याही पुढे इंजि.विश्वंभर पवार यांनी कामाचा ध्यास घेऊन झंजावात सुरू केला आहे, धडाडीचे युवा नेतृत्व,विकासाची जाण असणारा,गरिबांना मदत करणारा माणूस अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा त्यांनी पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास निश्चित निवडणूक लढविणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.