रावसाहेब महाराज खरबेकर यांचे दुःखद निधन
रावसाहेब महाराज खरबेकर यांचे दुःखद निधन
मानवत प्रतिनिधी
मानवत येथील स्वामी दिव्यानंद आश्रमाच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय व आध्यात्माचे कार्य करणारे श्री रावसाहेब महाराज खरबेकर ( गुरुजी ) वय ७५ यांचे गुरुवारी ता २ रात्री ८ वाजता उपचारादरम्यान परभणी येथे निधन झाले .
त्यांचा अंत्यसंस्कार शुक्रवारी ता ३ रोजी सकाळी ९ वाजता येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीत करण्यात आला .परमपूज्य गुरुवर्य ह. भ. प. रावसाहेब महाराजांनी दिव्यानंद धाम आश्रमाच्या माध्यमातून गेल्या ३५ वर्षांपासून त्यांनी अनेक शिष्य घडवून अविरत अध्यात्माचे कार्य केले. विचार सागर, अमृतानुभव, पंचीकरण, विचारचंद्रोदय या ग्रंथाची त्यांनी ऑनलाइन पाठ घेऊन प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी समाज जागृती केली .
त्यांची अंत्ययात्रा टाळ, मृदुंग व हरिनामाच्या गजरात काढण्यात आली . अंत्ययात्रेत
स्वामी रसानंद पुरी, महामंडलेश्वर स्वामी मनिषानंद पुरी , स्वामी महेशानंद पुरी जिंतूर , स्वामी हरीश चैतन्यमहाराज टाकळगव्हाण, यशवाडी संस्थानचे मठाधिपती शिवेंद्र महाराज , सागर महाराज बारटक्के , पुराणिक महाराज, भारती ताई , रामराव हेंडगे महाराज
माऊली महाराज , किशोर महाराज,हरिदास महाराज कानसुरकर , महादेव महाराज सोनपेठ, विनायक महाराज , भागवत महाराज मानोलिकर , महादेव महाराज , योगेश महाराज वडवणी , तारामती महाराज , उमेश दशरथे महाराज आळंदी, सुरेश महाराज उमरी यांचेसह शेकडो साधक मंडळी अंत्यविधीला उपस्थित होते .
त्यांचे पश्चात पत्नी , १ मुलगा , १ मुलगी , सून , जावई , नातवंडे असा परिवार असून येथील वास्तुविशारद आनंद निर्मळ यांचे ते वडील होत .