राम कथा मंडपात,मंदिरात नाही तर प्रत्येकाच्या घरात आचरणाने गेली पाहिजे- स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज
राम कथा मंडपात,मंदिरात नाही तर प्रत्येकाच्या घरात आचरणाने गेली पाहिजे- स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज
***************
भोकर (तालुका प्रतिनिधी) अनंत जन्माच्या पुण्याईने राम कथा ऐकावयास मिळते राम कळला तर समाजात खऱ्या अर्थाने परिवर्तन होईल,राम कथा मंडपात नाही मंदिरात नाही तर प्रत्येक घरामध्ये आचरणाने गेली पाहिजे असे विचार प.पू.बालयोगी आचार्य गजेंद्र चैतन्यजी महाराज यांनी भोकर येथील रामकथेत बोलताना मांडले.
भोकर येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने 10 ते 17 सप्टेंबर दरम्यान श्रीमद् भागवत कथा व राम कथेचे आयोजन करण्यात आले असून राम कथेच्या प्रारंभी पहिल्या दिवशीच्या कथेत पुढे बोलताना आचार्य बालयोगी गजेंद्र चैतन्य जी महाराज म्हणाले रामकथा ही प्रत्येकाच्या घरातील कथा आहे,कुटुंब आहे,परिवार आहे, आज प्रत्येक घराघरात महाभारतच झालेले दिसत आहे,घरामध्ये राम कथेचे आचरण आलेले नाही हे दुर्दैव आहे,जेव्हा राम कथा घराघरात जाईल तेव्हा खऱ्या अर्थाने परिवर्तन झालेले दिसेल,जीवनात अमुलाग्र बदल झालेला दिसेल,जगावं कसं ते राम कथा शिकवते तर मरावं कसं ते भागवत शिकवते,राम कथा आपल्या जीवनाचा आरसा आहे आज भाऊ भाऊ धुर्यासाठी भांडण करतात,राम कथा संजीवनी बुटी आहे ,राम कथा अंतरंगात उतरवली तर जगात कुणीच दुःखी राहणार नाही म्हणून वेळेचा सदुपयोग करा त्रेतायुगातील रामकथा आजही माणसाच्या जीवनाचा आशेचा किरण आहे,एका दिवशी आपण मरणार आहोत हे माहीत असतानाही फार मोठ्या अपेक्षा ठेवून आपण काम करतो ईश्वराचे स्मरण करून जीवनधन्य करा असे सांगून गोस्वामी तुलसीदास यांचे चरित्र स्वामीजींनी सांगितले