सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताशेती विषयीसरकारी योजना

युनियन बँक ऑफ इंडिया ग्राहकाभिमुख सेवेच्या दिशेने वेगाने पुढे : उदगीर शाखेत १०७ वा स्थापना दिवस साजरा

युनियन बँक ऑफ इंडिया ग्राहकाभिमुख सेवेच्या दिशेने वेगाने पुढे : उदगीर शाखेत १०७ वा स्थापना दिवस साजरा

उदगीर / प्रतिनिधी

ग्राहकाभिमुख आणि डिजिटल बँकिंग सेवेच्या माध्यमातून देशभरात आपला ठसा उमटवलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाने आपल्या १०७ व्या स्थापना दिनानिमित्त उदगीर येथे ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले. या कार्यक्रमात बँकेच्या परंपरा, प्रगती आणि डिजिटल विस्ताराचा आढावा घेत ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला.

उदगीर शाखेचे शाखाधिकारी विवेक करपे यांनी बँकेच्या इतिहासाचा उल्लेख करताना सांगितले की, “युनियन बँकेची स्थापना ११ नोव्हेंबर १९१९ रोजी शेट सिताराम पोतदार यांच्या प्रयत्नातून झाली. १९२१ मध्ये बँकेच्या मुख्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हस्ते झाले. आज बँक अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा देत देशातील अग्रगण्य सार्वजनिक बँकांपैकी एक म्हणून ओळखली जाते.”

एकूण व्यवसाय २२ लाख कोटींच्या पुढे

सप्टेंबर २०२५ अखेर बँकेचा एकूण व्यवसाय २२.०९ लाख कोटी रुपयांवर पोहोचला असून, १२.३४ लाख कोटी ठेवी आणि ९.७५ लाख कोटी कर्जवाटप यांचा समावेश आहे. देशभरात ८६०० शाखा, ९००० हून अधिक एटीएम, २५ हजार बीसी पॉईंट्स आणि ७५ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. परदेशातही हाँगकाँग, दुबई, सिडनी, अबुधाबी, लंडन आणि मलेशिया येथे शाखा व प्रतिनिधी कार्यालये आहेत.

डिजिटल सेवांचा नवा टप्पा : ‘Union Biz’ आणि ‘Union Ease’ चे लाँचिंग

ग्राहक मेळाव्यात भारत सरकारच्या आर्थिक सेवा विभागाचे सचिव एम. नागाराजू हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते व्यवसायिकांसाठी उपयुक्त “Union Biz” आणि सर्वसामान्य खातेदारांसाठी “Union Ease” ही दोन महत्त्वाची मोबाईल अॅप्स लाँच करण्यात आली. या अॅप्समुळे व्यवहार अधिक वेगवान, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याच कार्यक्रमात देशभरातील ५१ नवीन शाखांचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यात अहिल्यानगर एमआयडीसी नागापूर येथील नवीन शाखेचाही समावेश आहे.

“विकसित भारत २०४७ या महत्त्वाकांक्षी ध्येयपूर्तीमध्ये युनियन बँक ऑफ इंडिया महत्त्वाची भूमिका बजावेल,” असा विश्वास नागाराजू यांनी व्यक्त केला.

मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण उदगीर व अहिल्यानगर येथे प्रदर्शित करण्यात आले.अधिकारी, कर्मचारी व प्रतिष्ठित ग्राहकांची मोठी उपस्थिती या मेळाव्याला क्षेत्रप्रमुख सुनील कुमार यादव, उपक्षेत्रप्रमुख अमित कुमार सिन्हा, उपक्षेत्रप्रमुख सुभाष गजभिये, शाखाधिकारी विवेक करपे, उपशाखा प्रमुख सोमनाथ गुट्टे, ऋण अधिकारी दत्तात्रय शिंदे तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.

शहरातील प्रतिष्ठित ग्राहकांमध्ये अशोक बाहेती, रमेश बारोळे, राजकुमार पाटील, संदेश पेन्सलवार, संदीप मुक्कावर, अनिल मुंगिलवार, महेंद्र हुडे, ईश्वर महाजन, महेश पाटील, गंगाधर चिमणचोडे, माधव कुंभार, बालाजी ऐनापुरे, विष्णु अर्धवाड, सुधाकर यांजने, सूरज नावंदर, पापालाल बियाणी, तसेच ढोले साहेब (पंचायत समिती) यांचा समावेश होता.

कार्यक्रमात व्यापारी, उद्योजक, खातेदार आणि कर्जदार मोठ्या संख्येने सहभागी झाले. ग्राहकांनी नवीन डिजिटल उपक्रमांचे स्वागत करत बँकेच्या सेवांविषयी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button